Header

गुरे चारणार्‍या चार जणांवर अस्वलीचा हल्ला

गुरे चारणार्‍या चार जणांवर अस्वलीचा हल्ला

chandrapur-attack

चिचपल्ली वनक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक 435मधील सातारा तुकूम जंगलात गुरे चरावयास गेलेल्या गुराख्यावर अस्वलीने हल्ला केला. गुराख्याने आरडाओरड केल्याने तीघे जण त्याच्या मदतीला धावून आले. अस्वलीने तीघांवर देखील हल्ला चढवून त्यांना जखमी केले. हि घटना आज दुपारच्या सुमारास घडली. जखमी चारही जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुपेश कुळमेथे (29), प्रफूल सिडाम (51), विलास पेंदोर (55), सिताराम मडावी (62) रा. सातारा तूकूम असे जखमीचे नाव आहे. चारही जण गुरे चरावयास चिचपल्ली वनक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक 435 मधील सातारा तुकूम जंगलात जनावर घेऊन गेले असता यापैकी एका जणावर अस्वलीने हल्ला केला. त्याने आरडाओरड केल्याने इतर तिघांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. अस्वलीने त्यांच्यावर देखील हल्ला चढवीला. अस्वलीच्या हल्ल्यात चौघेही जखमी झाले आहे. चौघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भागात अस्वलीसह वाघाचा देखील धुमाकूळ असल्याने नागरीक भयभीत झाले आहे. शासनाने जखमींना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे विर्दभ कार्यकारी अध्यक्ष मनोज आत्राम यांनी केली आहे



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article