Header

Coronavirus | नोट आणि नाण्यांद्वारे पसरू शकतो का कोरोना संसर्ग, शास्त्रज्ञांनी दिले उत्तर; तुम्ही सुद्धा जाणून घ्या

Coronavirus | नोट आणि नाण्यांद्वारे पसरू शकतो का कोरोना संसर्ग, शास्त्रज्ञांनी दिले उत्तर; तुम्ही सुद्धा जाणून घ्या

Coronavirus | Corona infection can be spread by notes and coins, scientists answer; You also know.

लंडन : वृत्त संस्था – Coronavirus | नोट आणि नाण्यांद्वारे कोरोना व्हायरस (Coronavirus) पसरण्याच्या शक्यतेदरम्यान दुसर्‍या लाटेत ऑनलाइन आर्थिक व्यवहार वाढले आहेत. परंतु, एका अभ्यासात हे समोर आले आहे की नोटा किंवा नाण्यांद्वारे कोरोना पसरण्याची शक्यता नाही. युरोपीयन सेंट्रल बँकेच्या तज्ज्ञांनी आणि जर्मनीच्या रूहर-यूनिव्हर्सिटी बोखमच्या संशोधकांनी याबाबत शोध घेण्यासाठी अभ्यास केला.

अभ्यासात स्टेनलेस स्टीलच्या पृष्ठभागावर विविध प्रकारच्या नोटा, नाणी आणि पीव्हीसी बँक क्रेडिट कार्ड ठेवले गेले. तज्ज्ञांनी नुकसान न करणार्‍या कोरोना व्हायरससह कोविड-19 साठी जबाबदार सार्स-कोव्ह-2 व्हायरसने संक्रमित केले.

संशोधनात आढळले की, स्टीलच्या पृष्ठभागावर व्हायरस 7 दिवस जिवंत राहिला, परंतु नोट आणि नाण्यांवर तो दोन ते सहा दिवसात गायब झाला. पाच सेंटच्या तांब्याच्या नाण्यावर व्हायरस केवळ एक तासच टिकू शकला. संशोधकांना आढळले की, नोट किंवा नाण्यांद्वारे सार्स-कोव्ह-2 व्हायरस पसरण्याचा धोका नाहीच्या बरोबर आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

बीबीसीच्या रिपोर्टनुसार चीनमध्ये जेव्हा कोविड-19 मुळे मरणार्‍यांची संख्या 1500 पेक्षा जास्त
झाली होती तेव्हा चीनच्या सर्व बँकांना हे निर्देश दिले गेले होते की, संभाव्य प्रकारे कोरोना संक्रमित
करन्सी नोट परत घ्याव्यात आणि त्यांना सॅनिटाइज करण्याचे काम करावे. यापूर्वी झालेल्या
अभ्यासानुसार कोरोना व्हायरस काच आणि प्लॅस्टिकच्या पृष्ठ भागाच्या तुलनेत कागद आणि
कापडावर कमी दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो.

आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनात आढळले की, काच आणि प्लॅस्टिकच्या पृष्ठभागाच्या
तुलनेत कागद आणि कपड्यावर कोरोना कमी दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो शास्त्रज्ञांना अभ्यासात
आढळले की, व्हायरस काचेवर चार दिवस आणि प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टीलवर सात दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो.

web title: Coronavirus | Corona infection can be spread by notes and coins, scientists answer; You also know.

SSC Exam Results | पुण्यातील शाळांमध्ये 10 वीच्या गुणपत्रिका 9 ऑगस्टपासून मिळणार

Sugarcane Juice | ऊसाचा रस लीव्हरसाठी खुपच ‘हेल्दी’, वायरल इन्फेक्शनपासून होईल बचाव, इम्यूनिटी वाढते

Parambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; ठाण्यात तिसरा FIR दाखल, जाणून घ्या प्रकरण ?

Coronavirus | राज्यातील ST महामंडळाच्या बसेसला करणार अँटी मायक्रोबियल कोटिंग, व्हायरस पसरण्यापासून रोखणार

The post Coronavirus | नोट आणि नाण्यांद्वारे पसरू शकतो का कोरोना संसर्ग, शास्त्रज्ञांनी दिले उत्तर; तुम्ही सुद्धा जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article