Header

ICICI Bank ने आजपासून केला मोठा बदल, ग्राहकांना खर्च करावे लागतील जास्त पैसे; जाणून घ्या

ICICI Bank ने आजपासून केला मोठा बदल, ग्राहकांना खर्च करावे लागतील जास्त पैसे; जाणून घ्या

icici bank cash transaction atm withdrawal rules changes from today 1 august 2021

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ICICI Bank च्या खातेदारांना आजपासून जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. बँकेने बचत खातेधारकांना (savings account holders) साठी रोख व्यवहार, एटीएम इंटरचेंज (ATM Interchange Charges) आणि चेकबुक शुल्क (Cheque books) मर्यादेत बदल (ICICI Bank) केला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

कुठे मिळतील किती व्यवहार फ्री?
6 मेट्रो शहरे (Mumbai, New Delhi, Chennai, Kolkata, Bangalore and Hyderabad) मध्ये पहिले 3 एटीएम व्यवहार फ्री राहतील. तर, या शहरांव्यतिरिक्त सर्व शहरातील ग्राहकांना पहिल्या 5 एटीएम व्यवहारांवर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

द्यावे लागतील 20 रुपये
यापेक्षा जास्त ट्रांजक्शन केल्यास बँक 20 रुपये प्रति आर्थिक व्यवहार आणि 8.50 रुपये प्रति विना-आर्थिक व्यवहारावर वसूल करेल. हे शुल्क सिल्वर, गोल्ड, मॅग्नम, टायटेनियम आणि वेल्थ कार्डधारकांसाठी लागू असेल.

5 रुपये प्रति 1,000 वर द्यावे लागतील
ऑगस्ट महिन्यापासून ICICI Bank च्या ग्राहकांसाठी आपल्या होम ब्रँचमध्ये मूल्य मर्यादा 1 लाख असेल. यापेक्षा जास्त झाल्यास 5 रुपये प्रति 1,000 वर द्यावे लागतील. तर, नॉन-होम ब्रँचमध्ये प्रतिदिन 25,000 रुपयांपर्यंत रोख व्यवहारासाठी कोणतेही शुल्क नाही. 25,000 पेक्षा वर रुपये 5 प्रति 1,000 रुपये.

चेक बुक्स
एक वर्षात 25 चेकसाठी कोणतेही शुल्क नाही. तर, यानंतर तुम्हाला 20 रुपये प्रति 10 पानांचे अतिरिक्त चेकबुकसाठी द्यावे लागतील. कॅलेंडर महिन्याच्या पहिली रोकड काढण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही, यानंतर शुल्क द्यावे लागेल.

कुठेही रोख रक्कम काढणे
कॅलेंडर महिन्यात तुम्हाला पहिली रोकड काढण्यासाठी कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही. यानंतर
तुम्हाला 5 रुपये प्रति हजार रुपयांच्या हिशेबाने द्यावे लागतील.

कुठेही रोख जमा आणि कॅश रिसायकलर
याशिवाय ICICI Bank च्या शाखेत 5 रुपये प्रति हजार रुपये किंवा त्याचा भाग, किमान 150 च्या
अधीन, कॅश रिसायकलर मशीनवर एक कॅलेंडर महिन्याची पहिल्या रोख जमासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही, त्यानंतर शुल्क द्यावे लागेल.

Web Title : icici bank cash transaction atm withdrawal rules changes from today 1 august 2021

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Coronavirus | केंद्राकडून राज्याला अलर्ट ! महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुन्हा संपूर्ण Lockdown होणार?

Modi Government | खुशखबर ! नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल 7 लाखांची ‘ही’ सुविधा, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?

Lalbaugcha Raja | मुंबईत लालबागमध्ये यंदा साजरा केला जाणार गणेशोत्सव, राज्य सरकारने जारी केली गाईडलाईन

The post ICICI Bank ने आजपासून केला मोठा बदल, ग्राहकांना खर्च करावे लागतील जास्त पैसे; जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article