Header

India Post Payments Bank | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ‘या’ नियमात आजपासून होणार बदल; डोअरस्टेप बँकिंगसाठी मोजवे लागणार 20 रुपये

India Post Payments Bank | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ‘या’ नियमात आजपासून होणार बदल; डोअरस्टेप बँकिंगसाठी मोजवे लागणार 20 रुपये

India Post Payments Bank ippb bank update doorstep banking charges for india post payments bank customers from 1 august 2021

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय डाक विभागाने अलीकडेच पेमेंट बँक (India Post Payments Bank) सुरु केली आहे. अल्पावधीतच नागरिकांनी पोस्ट विभागाच्या या सुविधेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. मात्र ज्यांचे पोस्ट पेमेंट बँकेत खातं (India Post Payments Bank) असेल तर ही बातमी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बँकेच्या काही नियमांमध्ये काही बदल (bank rules change) करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. बँक डोअरस्टेप बँकिंगसाठी कोणतेही शुल्क (doorstep banking charges) आकारले जात नव्हते, मात्र आता यासाठी ग्राहकाला यासाठी 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आजपासून याची सुरुवात झाली आहे.दरम्यान, बँकेने 1 जुलैपासून व्याजदरात देखील कपात केली आहे, त्यामुळे बँकेकडून मिळणारे काही फायदे देखील घटले आहेत.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

व्याजदरातही कपात
अलीकडेच बँकेने व्याजदरातही (Bank interest rate) कपात केली होती. त्यामुळे आयपीपीबी (IPPB) मध्ये 1 जुलैपासून बचत खातं उघडणाऱ्यांना कमी दराने व्याज मिळणार आहे. पूर्वी एक लाख रुपयांपर्यंतच्या बॅलन्सवर सुरुवातीला 2.75 टक्के दराने व्याज मिळत होते. मात्र आता 25 बेसिस पॉइंट्सची (Basis points) कपात केली होती. त्यानंतर व्याजदर 2.50 टक्के झाला आहे.
ग्राहकांना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अँपच्या माध्यमातून बॅलन्स तपासण्याची (balance check), पैसे ट्रान्सफर (Money transfer) करण्याची आणि कोणत्याही आर्थिक व्यवहार (Financial transactions) करण्याची सुविधा देत आहे. बँक ग्राहकांना क्यूआर कार्डची (QR card) देखील सुविधा देत आहे.

SBI चा मान्सून धमाका, 31 ऑगस्टपर्यंत मिळेल स्वस्त Home Loan

असे उघडा ऑनलाइन बँक खाते
आयपीपीबीमध्ये ऑनलाइन बँक खाते उघडण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून (Google Play Store) आयपीपीबीचे अ‍ॅप (IPPB app) डाऊनलोड करा.
त्यानंतर अ‍ॅप सुरु केल्यानंतर त्याठिकाणी देण्यात आलेल्या ओपन युअर अकाऊंट नाऊ वर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर टाका.
तेथे विचारलेली सर्व माहिती भर. आपणाला यावेळी पॅन क्रमांकाची आणि आधार क्रमांकाची गरज भासेल.
त्याठिकाणी आधारावर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल.
यानंतर काही वैयक्तिक माहिती प्रविष्ट करावी लागेल- शैक्षणिक पात्रता, पत्ता, नॉमिनेशन इ. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट करा.
त्यानंतर तुमचे अकाउंट उघडले जाइल आणि अ‍ॅपच्या माध्यमातून ते वापरता येईल.

आयपीपीबी अ‍ॅप कसे वापरावे
आयपीपीबी अ‍ॅपमध्ये जाऊन तुम्हाला अकाऊंट नंबर, कस्टमर आयडी, जन्मतारिख आणि रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक टाकावा लागेल.
त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल.
त्यानंतर पिन सेट करून ओटीपी टाकावा लागेल. अशाप्रकारे ग्राहकांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल

Web Title : India Post Payments Bank | ippb bank update doorstep banking charges for india post payments bank customers from 1 august 2021

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

LPG Gas Cylinder Price | 73.5 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून घ्या नवे दर

7th Pay Commission | 10800 रुपयांपर्यंत वाढेल ‘या’ कर्मचार्‍यांची सॅलरी, जाणून घ्या आता किती वाढला महागाई भत्ता

The post India Post Payments Bank | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ‘या’ नियमात आजपासून होणार बदल; डोअरस्टेप बँकिंगसाठी मोजवे लागणार 20 रुपये appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article