Header

Jalgaon BJP | जळगावमध्ये कोंबड्या फेकाफेकीनंतर भाजप कार्यालयाचे केले शुद्धीकरण

Jalgaon BJP | जळगावमध्ये कोंबड्या फेकाफेकीनंतर भाजप कार्यालयाचे केले शुद्धीकरण

Jalgaon BJP jalgaon shiv sena chicken movement puja at bjp office

जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – Jalgaon BJP | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले. राज्यातील भाजपच्या अनेक कार्यालयात सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोंबड्या फेकत आंदोलन केले होते. जळगाव मध्येही असेच आंदोलन करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी भाजपने (Jalgaon BJP) श्रावण महिना सुरू असल्याने कार्यालय अपवित्र झाले, असा आरोप करीत होमहवन करून पक्ष कार्यालयाचे शुद्धीकरण केले.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याने संपूर्ण संपूर्ण राज्यात शिवसेनेनं तीव्र आंदोलन केलं. तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
काही ठिकाणी राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले तर काही ठिकणी भाजपच्या कार्यालयात कोंबडी फेको आंदोलन करण्यात आले.
जळगावमध्येही कोंबडी फेको आंदोलन करण्यात आल्याने भाजप कार्यालयाचे शुद्धीकरण करण्यात आले. आंदोलनाच्या नावाखाली हिंदूंचा पवित्र महिना श्रावणमास सुरू असताना या श्रावण महिन्यात शिवसेनेने कोंबडी फेकल्याने हे शुद्धीकरण करण्यात आल्याचे भाजप महिला व आध्यात्मिक आघाडीने म्हटले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
यावेळी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस रेखा वर्मा,
नीतू परदेशी, सरोज पाठक, रेखा कुलकर्णी, पूजा चौधरी, छाया सरस्वत, तृप्ती पाटील, ज्योती बर्गे,
कोकिळा मोरे, शर्वरी मोरे, सरीता बारी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी,
नितीन इंगळे, दीपक साखरे, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, जिल्हा सह प्रसिद्धिप्रमुख धिरज वर्मा,
आघाडी अध्यक्ष जयेश भावसार, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, मिलिंद चौधरी, राहुल वाघ,
निलेश झोपे उपस्थित होते.

Web Title : Jalgaon BJP | jalgaon shiv sena chicken movement puja at bjp office

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

TV Actor Gaurav Dixit | ड्रग्ज प्रकरणात टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितला अटक

ONGC | भारतीय बनावटीची अत्याधुनिक ड्रिलिंग रिग ओएनजीसीकडे सुपूर्द

e-SHRAM Card | आवश्य बनवा आपले ई-श्रम कार्ड, फ्री मिळेल 2 लाखाची ‘ही’ सुविधा, जाणून घ्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया

Pune Gang Rape Case | धक्कादायक ! पुण्याच्या दत्तवाडीत 25 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार, प्रचंड खळबळ

The post Jalgaon BJP | जळगावमध्ये कोंबड्या फेकाफेकीनंतर भाजप कार्यालयाचे केले शुद्धीकरण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article