Header

Lalbaugcha Raja | मुंबईत लालबागमध्ये यंदा साजरा केला जाणार गणेशोत्सव, राज्य सरकारने जारी केली गाईडलाईन

Lalbaugcha Raja | मुंबईत लालबागमध्ये यंदा साजरा केला जाणार गणेशोत्सव, राज्य सरकारने जारी केली गाईडलाईन

lalbaugcha raja ganeshotsav celebration this year under govt guidelines

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Lalbaugcha Raja | कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेचा धोका व्यक्त केला जात असतानाच मुंबईत यावेळी लालबागच्या राजाचा (Lalbaugcha Raja) दरबार भरणार आहे. लालबागमध्ये यावर्षी गणेश उत्सवाचे आयोजन केले जाईल, ज्यासाठी राज्य सरकारने रविवारी गाईडलाईन जारी (state government has issued guidelines) केली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, गणेश उत्सवाच्या आयोजनात कोविड प्रोटोकॉल (Covid protocol) बाबत कोणतीही शिथिलता असणार नाही.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

कोरोना महामारीमुळे मागच्या वर्षी लालबागमध्ये गणेश उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. येथे गणेश उत्सवाऐवजी ब्लड आणि प्लाझ्मा डोनेट कॅम्प लावण्यात आले होते, परंतु यावर्षी आयोजन होणार आहे.

लालबागच्या राजाची 4 फुटापेक्षा उंच मूर्ती नसणार
सरकारच्या गाईडलाईननुसार, लालबागमध्ये श्री गणरायाची मूर्ती 4 फुटापेक्षा जास्त उंच नसेल. सोबत जे लोक घरात गणपतीची मूती स्थापन करतील ते 2 फुटापेक्षा जास्त उंच मूर्ती ठेवू शकत नाहीत.

याशिवाय आयोजनाच्या दरम्यान कोविड प्रोटोकॉलकडे विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. राज्य सरकारने आयोजकांना सांगितले आहे की, कोरोना संकट लक्षात घेता गणेशोत्सव एकदम साध्या पद्धतीने साजरा केला जावा. देशात गणेश उत्सवाची सुरूवात 10 सप्टेंबरपासून होईल.

State Bank Of India | SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट; पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास बँकिंग सेवेवर होणार परिणाम

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती व्यक्त केली जात असताना लालबागचा गणेशोत्सव साजरा करणे
किती संयुक्तीक ठरेल असा प्रश्न उपस्थित होत आहे, कारण महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढू
लागली आहेत. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये नवीन केस वेगाने वाढत आहेत. मागील 24 तासात
महाराष्ट्रात कोरोनाच्या साडेसहा हजार केस समोर आल्या आहेत.

Web Title : lalbaugcha raja ganeshotsav celebration this year under govt guidelines

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

LPG Gas Cylinder Price | 73.5 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून घ्या नवे दर

7th Pay Commission | 10800 रुपयांपर्यंत वाढेल ‘या’ कर्मचार्‍यांची सॅलरी, जाणून घ्या आता किती वाढला महागाई भत्ता

Weight Loss | कॅलरी इनटेक कमी करण्यासाठी डाएटमध्ये ‘या’ पदार्थांचा करा समावेश, कमी होईल लठ्ठपणा

The post Lalbaugcha Raja | मुंबईत लालबागमध्ये यंदा साजरा केला जाणार गणेशोत्सव, राज्य सरकारने जारी केली गाईडलाईन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article