Header

Pari Paswan | ‘कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून अश्लिल चित्रफीत तयार केली; ‘या’ मिस इंडिया युनिव्हर्सचा आरोप

Pari Paswan | ‘कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून अश्लिल चित्रफीत तयार केली; ‘या’ मिस इंडिया युनिव्हर्सचा आरोप

Pari paswan miss india universe pari paswan allegations against production house making video

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Pari Paswan | मागील काही महिन्यापासून बॉलीवूडमधून खळबळ उडवणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. नुकतंच बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) अश्लील चित्रफीत प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर अनेक प्रकारे चौकशीचे सत्र सुरु असतानाच आणखी एक खळबळ उडवणारे प्रकरण समोर आलं आहे. झारखंडच्या धनबाद येथील मिस इंडिया युनिव्हर्स परी पासवानने (Miss India Universe Pari Paswan) मुंबई मधील एका प्रोडक्शन कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. प्रोडक्शन कंपनीने आपल्यासोबत खोडसाळपणा केल्याचा आरोप मिस इंडिया युनिव्हर्स परी पासवानने (Pari Paswan) कला आहे. पण, ती कंपनी नेमकी कोणाची? हे तिला माहित नाही.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

परी पासवान (Pari Paswan) ही मॉडेलिंग करते. म्हणून ती काम शोधण्यासाठी मुंबईला आली होती. दरम्यान, तिच्यासोबत भयंकर घटना घडल्याचं तिने म्हटले आहे.
‘मी काम शोधण्यासाठी मुंबईला गेले होते. एका ठिकाणी (Cold drink) मध्ये गुंगीचं औषध मिसळून माझा अश्लिल व्हिडीओ तयार करण्यात आला असल्याची माहिती तिने दिली आहे.
त्यावेळी ती म्हणाली, ‘जेव्हा मला याची माहिती मिळाली, तेव्हा मी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलीस घटनेचा तपास करत असल्याचं तिनं सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच परी पासवाननं तिचा पती नीरज पासवानविरोधात
(Neeraj Paswan) पोलिसात तक्रार दाखल केलीय.
हुंड्यासाठी छळवणूक होत असल्याची तक्रार तिने दीर चंदन आणि सासू आशा देवी विरोधात केला होता. याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर नीरजला धनबाद पोलिसांनी (Dhanbad Police) अटक केलीय. नीरजच्या कुटुंबीयांनीही परीवर आरोप केलेत.
नीरजच्या अगोदर परीने आणखी 2 तरुणांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत.
तिने 2 तरुणांशी विवाह केले असून, त्यांच्या विरोधातही गुन्हे दाखल केले असल्याचा दावा नीरजचा भाऊ चंदनने देखील केला आहे.

या दरम्यान, ‘झारखंडच्या गुमलामध्ये वास्तव्यास असलेल्या मॉडेल परी पासवाननं 2019 साली मिस इंडिया युनिव्हर्स खिताब (Miss India Universe title) पटकावला.
कतराजमध्ये देखील राहणाऱ्या नीरजसोबत तिचं लग्न झालं.
दरम्यान, पती आणि सासरची मंडळी हुंड्याची मागणी करून त्रास देत असल्याचा आरोप तिने केलाय.
त्यानंतर तिच्या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Web Title : Pari paswan | miss india universe pari paswan allegations against production house making video

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Pune Anti Corruption | 5000 रुपयाची लाच घेताना शिरूर येथील भूकरमापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Parambir Singh | परमबीर सिंह यांनी भरला 50 हजाराचा दंड, जाणून घ्या प्रकरण

Nashik Crime | वाहनावर अशोकस्तंभ लावून लोकसेवक असल्याचे भासवणारा गजाआड, नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई

The post Pari Paswan | ‘कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून अश्लिल चित्रफीत तयार केली; ‘या’ मिस इंडिया युनिव्हर्सचा आरोप appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article