Header

Pune Crime | पुण्यात 2 महिलांची भांडणे पाहणे सुरक्षा रक्षकाला पडले ‘महागात’, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्यात 2 महिलांची भांडणे पाहणे सुरक्षा रक्षकाला पडले ‘महागात’, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime Watching the quarrel of 2 women in Pune the security guard got expensive find out the case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | भांडणे सोडविण्यास मध्यस्थी केल्याच्या कारणावरुन एखाद्या मारहाण केली जाण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. पण, एका सुरक्षा रक्षकाला दोन महिलांमधील भांडणे पाहणे चांगलेच महागात पडले. महिलेच्या भाच्याने ७ ते ८ मुलांना बोलावून या भांडणे पाहणार्‍या सुरक्षा रक्षकाला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण (Pune) करुन जखमी केले.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याप्रकरणी सुरक्षा रक्षक चेतन जाधव (वय २७, रा. जळोची, ता. बारामती) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी वैभव साबळे, नितीन खोमणे, बंटी भोसले, साबळे महिलेचा भाचा व इतर ७ ते ८ मुले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन जाधव हे बारामती तालुक्यातील जळोची येथील चव्हाण इको पार्क सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.
ते सोसायटीत रविवारी दुपारी ४ वाजता सुरक्षारक्षक म्हणून ड्युटी करीत होते.
ते सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभे असताना समोरील बिल्डिंगमधील साबळे या महिला व दुसर्‍या एका महिलेची भांडणे चालू होती.
ही भांडणे ते बघत असल्यामुळे साबळे यांचा भाचा याने चिडून जाऊन ७ ते ८ मुलांना बोलावले.
त्या मुलांपैकी वैभव साबळे याने फायटरने फिर्यादीच्या डोक्यात डावे व उजवे बाजुस मारले.
नितीन खोमणे याने फरशी उचलून डोक्यात घातली.
बंटी भोसले याने चाकू मारण्याचा प्रयत्न केला व इतर ७ ते ८ मुलांनी फिर्यादी व त्याच्या भावाला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले.

Web Title : Pune Crime | Watching the quarrel of 2 women in Pune the security guard got expensive find out the case

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

West Nile Virus | नवीन संकट ! कोरोना दरम्यानच वेस्ट नाईल व्हायरसचा धोका वाढला, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावाचे उपाय

Ahmadnagar Police Transfer | नगर जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल, 9 पोलीस निरीक्षकांसह 46 अधिकाऱ्यांच्या बदल्या

Rules Change | मोबाइल यूजर्ससाठी महत्वाची बातमी ! 1 सप्टेंबरपासून बदलतील ‘हे’ 5 नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता होणार परिणाम

The post Pune Crime | पुण्यात 2 महिलांची भांडणे पाहणे सुरक्षा रक्षकाला पडले ‘महागात’, जाणून घ्या प्रकरण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article