Header

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात तब्बल 439 फ्लॅटमध्ये चोरी, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात तब्बल 439 फ्लॅटमध्ये चोरी, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | What do you say Yes, theft in 439 flats in Pune, know the case.

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  – Pune Crime | झोपडपट्टी धारकांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीमधील 439 फ्लॅटमध्ये शिरुन चोरट्यांनी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर येथील शिंदे वस्तीत (Shinde Vasti, Hadapsar) हा प्रकार घडला (Pune Crime) आहे.

याप्रकरणी तहसीलदार विकास भालेराव Tehsildar Vikas Bhalerao (वय 47, रा. फुलेनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. भालेराव हे तहसीलदार ताबा या पदावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये (Slum Rehabilitation Authority Pune and Pimpri Chinchwad) कार्यरत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने शिंदे वस्ती येथे झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यासाठी इमारती बांधल्या आहेत.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

या इमारती कुलूप लावून बंद असताना इमारत क्रमांक A विंगमधील 215 सदनिका व B विंगमधील 224 सदानिका अशा एकूण 439 सदनिकाचे कडी कोयंडा तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश केला. या घरातील नळ, मिक्सर व शॉवर असे तब्बल 1 लाख 9 हजार 750 रुपयांचा माल चोरुन नेला. चोरीचा हा प्रकार 4 जून ते 26 ऑगस्ट 2021 दरम्यान घडला आहे. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक माने (PSI Mane) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | What do you say Yes, theft in 439 flats in Pune, know the case.

 

 

e-SHRAM Card | आवश्य बनवा आपले ई-श्रम कार्ड, फ्री मिळेल 2 लाखाची ‘ही’ सुविधा, जाणून घ्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया

Pune Gang Rape Case | धक्कादायक ! पुण्याच्या दत्तवाडीत 25 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार, प्रचंड खळबळ

Pune Crime | भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

NEET-UG 2021 Exam News | नीट यूजी 2021 परीक्षा होणार नाही स्थगित, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती

The post Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात तब्बल 439 फ्लॅटमध्ये चोरी, जाणून घ्या प्रकरण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article