Header

Pune Crime | कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी, सराईत गुन्हेगारावर FIR

Pune Crime | कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी, सराईत गुन्हेगारावर FIR

Pune Crime FIR against a thief in Sarai for fear of being stabbed

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करुन परिसरात आरडाओरडा करुन दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर खडक पोलीस ठाण्यात (Khadak police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.28) सकाळी सहाच्या सुमारास भवानी पेठेतील (Bhavani Peth) बच्चुभाईवाडा येथे (Pune Crime) घडला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

आरबाज उर्फ बबन शेख Arbaaz alias Baban Sheikh (रा. चुडामन ताली चौक, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे (criminal) नाव आहे. याप्रकरणी मांगुसिंग रामसिंग मांगलिया (वय-45 रा. सह्याद्री नगर, धनकवडी) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी शेख याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरबाज आणि फिर्यादी मांगलिया हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी हे भवानी पेठेतील बच्चुभाईवाड्यासमोर उभे होते.
त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला.
त्याने फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून खिशातील 10 हजार 360 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
तसेच फिर्यादी यांचा मोबाईल भींतीवर आपटून फोडला.
त्यानंतर आरोपीने हातातील कोयता हवेत फिरवून आरडाओरडा करुन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

Web Titel : Pune Crime FIR against a thief in Sarai for fear of being stabbed

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Money | 1 सप्टेंबरपासून बदलतील रोजच्या जीवनाशी संबंधीत ‘हे’ 8 नियम, सर्वसामान्यांवर होईल थेट परिणाम; जाणून घ्या

Crime News | कलयुग ! शेत विकून बायकोच्या खात्यात जमा केले 39 लाख, 11 रुपये ठेवून शेजार्‍यासोबत नोकरदार पत्नी फरार

Video Viral | ‘विरोध करणार्‍या शेतकर्‍यांचं डोकं फोडून टाका’, लाठीचार्ज करण्यापूर्वी पोलिसांना आदेश देणार्‍या उप न्यायदंडाधिकार्‍यांचा व्हिडीओ व्हायरल

The post Pune Crime | कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी, सराईत गुन्हेगारावर FIR appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article