Header

Pune Crime | जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, दोघांना अटक

Pune Crime | जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, दोघांना अटक

pune crime fatal attack on a young man from an old dispute both arrested

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | जुन्या वादातून तरुणावर तिघांनी जीवघेणा हल्ला करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi police station) तिघांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून दोघांना अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.27) कर्वेनगर बिल्डींगच्या समोरील सार्वजनिक रोडवर रात्री साडे नऊच्या सुमारास घडला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

अक्षय शांताराम सावंत असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशाल सुधाकर बोकन (वय-26 रा. वारजे जकात नाका), सिध्याप्पा कंदकुर (वय-19) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे असून सागर कोळेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सीमा शांताराम सावंत (वय-47 रा. प्राईम हेरीटेज, शिवणे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि अक्षय यांच्यामध्ये पूर्वी वाद झाले होते. याच वादाचा राग मनात धरुन आरोपींनी संगनमत करुन अक्षयवर लोखंडी रॉड व सिमेंट गट्टुने हल्ला केला. आरोपींनी अक्षयच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी अक्षयच्या आईने तिघांविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. पुढील तपास वारजे पोलीस करीत आहेत.

Web Title : pune crime fatal attack on a young man from an old dispute both arrested

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | ‘या’ आठवड्यात सुद्धा स्वस्त झाले सोने, आता 9051 रुपये कमी दरात खरेदी करा 10 ग्रॅम; जाणून घ्या भाव

Earn Money | सरकारच्या मदतीने केवळ 5 हजारात सुरू करा हा व्यवसाय, दर महिना होईल 50 हजारपेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

Pune Crime | काय सांगता ! होय, पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालावर चोरट्यांचा ‘डल्ला’

The post Pune Crime | जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, दोघांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article