Header

Pune Crime | काय सांगता ! होय, पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालावर चोरट्यांचा ‘डल्ला’

Pune Crime | काय सांगता ! होय, पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालावर चोरट्यांचा ‘डल्ला’

pune crime theft in mamledar kacheri near khadak police station

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यात घरफोडीच्या (Pune Crime) घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालावरच चोरट्यांनी डल्ला (theft) मारल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी पोलिसांच्या मुद्देमाल खोलीच्या छताचे कौले काढून 27 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार 13 जून 2021 ते 15 जुलै 2021 या कालावधीत शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरी आवारात घडला (Pune Crime) आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

ग्रामीण पोलीस दलातील हवेली पोलीस ठाण्याचे (Haveli Police Station) पोलीस हवालदार दिलीप तुकाराम गायकवाड (वय-56) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak police station) फिर्याद दिली आहे. गायकवाड यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 15 जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरी आवारातील एका खोलीत जुने हवेली पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्यात आला आहे. चोरट्यांनी मुद्देमाल खोलीच्या छताचे कौले काढून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी खोलीतून अॅल्युमिनीअम पट्ट्या, तांब्याची तार, गॅस सिलेंडर, अ‍ॅल्युमिनीअम लाद्या असा एकूण 27 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब सावंत (API Nanasaheb Sawant) करीत आहेत.

Web Titel : pune crime theft in mamledar kacheri near khadak police station

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Money | 1 सप्टेंबरपासून बदलतील रोजच्या जीवनाशी संबंधीत ‘हे’ 8 नियम, सर्वसामान्यांवर होईल थेट परिणाम; जाणून घ्या

Crime News | कलयुग ! शेत विकून बायकोच्या खात्यात जमा केले 39 लाख, 11 रुपये ठेवून शेजार्‍यासोबत नोकरदार पत्नी फरार

Video Viral | ‘विरोध करणार्‍या शेतकर्‍यांचं डोकं फोडून टाका’, लाठीचार्ज करण्यापूर्वी पोलिसांना आदेश देणार्‍या उप न्यायदंडाधिकार्‍यांचा व्हिडीओ व्हायरल

The post Pune Crime | काय सांगता ! होय, पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालावर चोरट्यांचा ‘डल्ला’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article