Header

Pune Crime | भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

Pune crime one more crime registered on former bjp pune cantonment corporator vivek yadha.

पुणे :बहुजननामा ऑनलाईन  – Pune Crime | आपल्यावर जीवघेणा हल्ला केलेल्याची सुपारी देऊन पिस्तुले पुरविलेल्या व मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्या भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. या प्रकरणी अकबर पिरसाब शेख (वय 35, रा. पानसरेनगर, येवलेवाडी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विवेक यादव (Vivek Yadhav) व त्याच्या ८ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

हा प्रकार कॅम्पमधील जान मोहम्मद स्ट्रीटवरील 15 ऑगस्ट चौकाजवळील कणसे गॅरेजसमोर 9 जानेवारी 2020 रोजी घडला होता. अकबर शेख हा मोटारसायकलवरुन जात असताना आरोपी हे मोटारसायकलवरुन आले. त्यांनी त्यांची मोटारसायकल आडवी लावून शेख याला थांबायला भाग पाडले. विवेक यादव याने त्यांना शिवीगाळ करुन कंबरेला असलेला कोयता दाखवून तुला लय मस्ती आली आहे काय परत, विवेक भाईचे विरोधात अर्ज केला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती.

याबाबत फिर्यादी यांनी लष्कर पोलीस ठाणे व पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज केला होता.या अर्जाच्या अनुषंगाने पोलिसांनी फिर्यादी व आरोपी यांना समोरासमोर बोलावले होते.
त्यामुळे आरोपीसमोर येण्यास घाबरल्यामुळे ते आले नाही व त्यांनी तक्रार दिली नव्हती.
आता पोलिसांनी कारवाई केल्यानंतर ते तक्रार देण्यास पुढे आले.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

विवेक यादव याच्यावर 2016 मधील गणेश विसर्जन मिरवणुकीत बबलु गवळी याने गोळीबार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता.
याचा बदला घेण्यासाठी शिक्षा भोगत असलेला व कोरोनामुळे कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या राजन राजमणी व त्याचा साथीदार इब्राहिम शेख यांना विवेक यादव याने बबलु गवळी यांची सुपारी दिली होती.
त्यासाठी त्याने या दोघांना 3 पिस्तुले व 7 काडतुसे पुरविली होती.
कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे (PSI Prabhakar Kapure) व त्यांच्या पथकाने शस्त्रे बाळगल्याप्रकरणी या दोघांना पकडले होते.

त्यांच्याकडील मोबाईलमधील व्हॉटसअ‍ॅपवरील संभाषणावरुन खुनाची सुपारी दिल्याचा हा कट उघडकीस आला होता. त्यानंतर फरार  झालेल्या विवेक यादव (former bjp pune cantonment corporator vivek yadhav) याला गुजरात -राजस्थान सीमेवरुन पोलिसांनी पकडले होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांच्या आदेशावरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

 

web title: Pune crime one more crime registered on former bjp pune cantonment corporator vivek yadha.

 

COVID-19 in India | कोरोनाचा ग्राफ भीतीदायक ! देशात गेल्या 24 तासात आल्या 46759 नवीन केस, 509 जणांचा मृत्यू

Corona Vaccination | कोरोनाविरूद्ध विक्रमी लसीकरण, शुक्रवारी 1 कोटी लोकांना दिली व्हॅक्सीन

Pune Crime Branch Police | पुण्यातील व्यवसायिकांना ब्लॅकमेलिंग ! गुन्हे शाखेकडून ‘सम्यक’ पत्रकार संघाच्या अध्यक्षासह 3 रिपोर्टरला 2 लाखाची खंडणी घेताना अटक, प्रचंड खळबळ; जाणून घ्या प्रकरण

Maharashtra Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 4,654 नवीन रुग्ण, 3,301 जणांना डिस्चार्ज

The post Pune Crime | भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article