Header

Pune Crime | पुण्यातील कोव्हीड केंद्रात पुन्हा चोरी, डाटा एन्ट्रीचा कॉम्प्युटर गायब

Pune Crime | पुण्यातील कोव्हीड केंद्रात पुन्हा चोरी, डाटा एन्ट्रीचा कॉम्प्युटर गायब

pune crime theft again at the covid center in pune the computer of the data entry went missing

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | कोरोना विरोधी लस नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी लसीकरण केंद्र (covid vaccination center) सुरु करण्यात आली आहेत. मात्र पुणे शहरात (Pune Crime) दिवसेंदिवस चोरीच्या घटनामध्ये वाढ होत असून चोरट्यांनी आपला मोर्चा लसीकरण केंद्राकडे वळवला आहे. पुणे शहरात (Pune Crime) काही दिवसांपूर्वी कर्वेनगरमधील (Karvenagar) लसीकरण केंद्रात चोरी झाली होती. त्यानंतर आता केशवनगर (Keshavnagar) येथील लसीकरण केंद्रात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हा प्रकार माळवाडी येथील कै. विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहातील लसीकरण केंद्रात 28 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान घडला आहे. याप्रकरणी प्रशांत उत्तम कुंजीर (वय-39 रा. स.नं. 5, केशवनगर पोलीस चौकीच्या मागे, मुंढवा) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) फिर्याद दिली आहे. कुंजीर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत पवार हे लसीकरण केंद्रामध्ये काम करतात. लसीकरण
केंद्रामध्ये डाटा एंट्री (Data entry) करण्यासाठी संगणक ठेवण्यात आला आहे. चोरट्यांनी
लसीकरण केंद्राचे कुलूप तोडून 15 हजार रुपये किमतीचा संगणक चोरून (Stealing a
computer) नेला. 13 ऑगस्ट रोजी पवार यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास लसीकरण केंद्र
उघडले असता संगणक चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Web Title : pune crime theft again at the covid center in pune the computer of the data entry went missing

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | ‘या’ आठवड्यात सुद्धा स्वस्त झाले सोने, आता 9051 रुपये कमी दरात खरेदी करा 10 ग्रॅम; जाणून घ्या भाव

Earn Money | सरकारच्या मदतीने केवळ 5 हजारात सुरू करा हा व्यवसाय, दर महिना होईल 50 हजारपेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

Pune Crime | काय सांगता ! होय, पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालावर चोरट्यांचा ‘डल्ला’

The post Pune Crime | पुण्यातील कोव्हीड केंद्रात पुन्हा चोरी, डाटा एन्ट्रीचा कॉम्प्युटर गायब appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article