Header

Pune News | पीएमपीएलची कात्रज-वांगणीवाडी, हडपसर-फुरसुंगी बससेवा सुरू

Pune News | पीएमपीएलची कात्रज-वांगणीवाडी, हडपसर-फुरसुंगी बससेवा सुरू

pune news katraj wanganiwadi hadapsar fursungi bus started mayor murlidhar mohol

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | पीएमपीएमएलकडून (PMPML) अटल बस योजना (atal bus seva yojana) सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत 10 रुपयात संपूर्ण दिवस प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. शहरातील महत्त्वाच्या मार्गावर ही सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर आता या योजनेत हडपसर ते संकेत विहार Hadapsar to Sanket Vihar (फुरसुंगी-Fursungi) (मार्ग क्र. एच 11/1) आणि कात्रज ते वांगणीवाडी Katraj to Wanganiwadi (मार्ग क्र. 296 अ) या नवीन मार्गाचा समवेश करण्यात आला आहे. नुकतेच दोन्ही मार्गावरील बसची सुरुवात महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांच्या हस्ते करण्यात (Pune News) आली.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते वांगणीवाडी मार्गावरील बससेवा सुरु करण्यात आली. या प्रसंगी माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे, नियोजन अधिकारी चंद्रकांत वरपे, जनता संपर्क अधिकारी सतीश गाटे, कात्रज आगार व्यवस्थापक विजय रांजणे आदी उपस्थित होते.

असा असेल मार्ग…

मार्ग क्रमांक एच 11 हडपसर ते संकेत विहार या बससेवेचा मार्ग हडपसर गाडीतळ, भाजी मंडई, काळे कॉलनी, गणेश विहार, समृद्धी हॉटेल, न्हावले वाडा, महादेव मंदिर, रेल्वे गेट, ड्रीम आकृती सोसायटी, ड्रीम रचना, ढेरे कंपनी, संकेत विहार असा असेल. मार्ग क्रमांक 296 अ – कात्रज ते वांगणीवाडी या बस सेवेचा मार्ग कात्रज, शिंदेवाडी, वेळू, शिवापूर, वरवे, केळवडे, चेलाडी फाटा, नसरापूर गाव, माळेगाव, वीरवाडी जांभळी, कुरुंगवडी फाटा, आंबवणे, करंजवणे, मांगदरी, निगडे, वांगणी गाव, वांगणीवाडी असा असेल.

Web Title : pune news katraj wanganiwadi hadapsar fursungi bus started mayor murlidhar mohol

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील 4 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Rules Change | मोबाइल यूजर्ससाठी महत्वाची बातमी ! 1 सप्टेंबरपासून बदलतील ‘हे’ 5 नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता होणार परिणाम

The post Pune News | पीएमपीएलची कात्रज-वांगणीवाडी, हडपसर-फुरसुंगी बससेवा सुरू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article