Header

BJP Former Minister Suicide | भाजपच्या माजी मंत्र्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं प्रचंड खळबळ

BJP Former Minister Suicide | भाजपच्या माजी मंत्र्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं प्रचंड खळबळ

Former chhattisgarh minister rajinder pal singh bhatia found hanging at home suicide suspected.

बहुजननामा ऑनलाईन टीम – BJP Former Minister Suicide | छत्तीसगडचे भाजपचे माजी परिवहनमंत्री राजिंदरपाल सिंग भाटिया (Rajinder Pal Singh) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (BJP Former Minister Suicide ) उघडकीस आली. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.

तीन वेळा खुज्जी विधानसभा मतदार संघातून राजिंदरपाल सिंग भाटिया आमदार राहिले आहेत. रमण सिंह सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना मंत्रिपद दिले होते. मात्र, त्यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यांना सीएसआईडीसीचे चेअरमनपद देण्यात आले होते.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

मिळालेली माहिती अशी की, छुरिया येथे लहान भावासोबत राजिंदरपाल सिंग भाटिया राहत होते. रविवारी सायंकाळी ते घरी एकटेच होते. कुटूंबातील इतर सदस्य घरी आले त्यावेळी त्यांना राजिंदरपाल गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले.
तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही.
त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागील (BJP Former Minister Suicide) कारण समजू शकले नाही. मात्र, ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते,
असे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमातून प्रसारित करण्यात आले होते.
दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या आत्महत्येबाबतचा तपास सुरू केला आहे.

Web Titel :- Former chhattisgarh minister rajinder pal singh bhatia found hanging at home suicide suspected.

 

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत घसरणीचा ‘कल’ कायम ! 10,000 रुपयांनी ‘स्वस्त’ मिळतंय एक तोळा, जाणून घ्या नवीन दर

mParivahan | आता संपुर्ण देशात कुठंही फिरताना ‘DL’ आणि ‘RC’ सोबत ठेवण्याची गरज नाही; ‘DigiLocker’ सुद्धा असेल मान्य

Pune Crime | गांजा ओढणार्‍या 3 अल्पवयीन मुलांचा एकमेकांवर चाकू हल्ला; पुण्यातील कोंढवे -धावडे येथील घटना

Ramdas Kadam | ‘वैभव खेडेकरांच्या आरोपांना भीक घालत नाही, ते मनसेचे की राष्ट्रवादीचे?’ असा खेडच्या जनतेला प्रश्न – रामदास कदम

The post BJP Former Minister Suicide | भाजपच्या माजी मंत्र्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं प्रचंड खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article