Header

ED | ईडीची मोठी कारवाई ! शिवसेना खा. भावना गवळींच्या अडचणीत आणखी वाढ

ED | ईडीची मोठी कारवाई ! शिवसेना खा. भावना गवळींच्या अडचणीत आणखी वाढ

ED | ed raid at shivsena mp bhavana gawali related offices in parbhani pathari arrest saeed khan.

परभणी :  बहुजननामा ऑनलाईन  – ED | काही दिवसांपुर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ED) शिवसेना नेत्या आणि वाशीम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी (MP Bhavana Gavali) यांच्या काही संस्थावर छापेमारी केली होती. त्यावेळी गवळी या चांगल्याच अडचणीत आल्या. यानंतर आता आणखी त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसत आहे. ईडीने आता परभणी येथील पाथरी (Pathari) याठिकाणी मोठी कारवाई केलीय. यातच भावना गवळी यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सईद खान (Saeed Khan) यांना अटक (Arrested) ईडीने अटक केली आहे. खान हे संबंधित कंपनीचे संचालक असल्याने आता भावना गवळींच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.

परभणी येथील पाथरी या ठिकाणी असलेल्या कंपनीवर ईडीने (ED) कारवाई केली आहे. तर, संबंधित कंपनीचे संचालक असलेले सईद खान (Saeed Khan) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. खान हे शिवसेना खासदार भावना गवळी (MP Bhavana Gavali) यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महिला प्रतिष्ठान या ट्रस्टचं कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खान यांना अटक करण्यात आलीय.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दरम्यान, शिवसेना खासदार भावना गवळी (MP Bhawana Gawali) यांच्या संबंधित असणाऱ्या 9 ठिकाणांवर ED ने छापेमारी केल्यानंतर,
आता परभणी येथील पाथरी याठिकाणी ED ने मोठी कारवाई केली आहे.
तर, ज्या कंपनीच्या चौकशीसाठी सईद खान यांना अटक करण्यात आली आहे.
त्याच कंपनीमध्ये भावना गवळी या निर्देशक म्हणजेच अध्यक्षा होत्या.
त्यामुळे आगामी काळामध्ये भावना गवळी यांची या प्रकरणामध्ये चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये याबाबत दुसरं प्रकरण आहे त्यामध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ED) कारवाई केलीय.

Web Title :- ED | ed raid at shivsena mp bhavana gawali related offices in parbhani pathari arrest saeed khan.

 

Pune News | मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावरील कारवाईच्या विरोधात मुस्लिम संघटनांचा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

FSSAI | ग्राहकांना खराब अन्न खाऊ घालणे रेस्टॉरंट, ढाबा चालकांना पडणार महागात ! 1 ऑक्टोबरपासून बिलावर 14 अंकी रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक

Gold Price Today | आजही सोन्याच्या किंमती उतरल्या; 10,200 रुपयांनी सोनं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today | डिझेलच्या दरात मोठी वाढ, पेट्रोलही महागले; जाणून घ्या नवीन दर

The post ED | ईडीची मोठी कारवाई ! शिवसेना खा. भावना गवळींच्या अडचणीत आणखी वाढ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article