Header

Gold Price Today | सोन्याच्या दरात सलग घसरण, चांदीही ‘स्वस्त’; जाणून घ्या

Gold Price Today | सोन्याच्या दरात सलग घसरण, चांदीही ‘स्वस्त’; जाणून घ्या

gold price today gold rate price today on 27 september 2021 forecast outlook silver price rate today.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | मागील काही दिवसापासून सातत्याने सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Price Today) वारंवार बदल होत असतो. मात्र, मागील आठ दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण बदल होताना दिसत आहे. सोन्याच्या सलग घसरणीमुळे ग्राहकांना सोनं खरेदीसाठी एक मोठी संधी आहे. आज (सोमवारी) सोन्याच्या किंमतीत घसरण होऊन 22 कॅरेट सोनं 45,240 रुपये पर्यंत पोहचले आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही (Silver Price) घसरण झाली आहे. त्यामुळे आजचा चांदीचा दर 59,900 रुपये आहे.

आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Price) घसरण होत आहे. गेल्या सात ते आठ दिवसापांसून सोन्याच्या किंमती उतरताना दिसत आहेत. त्यामुळे सोनं खरेदीसाठी ही योग्य वेळ असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सामान्य सोन्याचा भाव आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. (Gold Price Today)

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

आजचे सोन्याचे दर –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 44,440 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 47,580 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 45,240 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 46,240 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 45,240 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 46,240 रुपये

चांदीचा दर (Silver Price) – 59,900 रुपये

 

web title : gold price today gold rate price today on 27 september 2021 forecast outlook silver price rate today.

 

Renukamata Temple | ‘रोप-वे’ने जोडले जाईल रेणुकामाता मंदिर, लाखो भक्तांना मोठा दिलासा

Dombivli Gangrape Case | डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेचा पैसे कमावण्याचे साधन म्हणून वापर

Stock Market | शेयर बाजारातून कमावण्याची संधी ! 70 आयपीओ रांगेत, 28 कंपन्यांनी जमवले 42000 कोटी

Home Loan Tips | पहिल्यांदा घर खरेदी करणार्‍यांसाठी अतिशय कामाच्या आहेत ‘या’ होम लोन टिप्स, तुम्हीही जाणून घ्या

The post Gold Price Today | सोन्याच्या दरात सलग घसरण, चांदीही ‘स्वस्त’; जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article