Header

Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित घट तर चांदी वधारली, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित घट तर चांदी वधारली, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today | gold price today dropped and silver gains check todays latest price of gold and sliver.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | मागील काही दिवसापासून सोन्याच्या किंमती (Gold Price Today) घसरताना दिसत आहेत. भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्याचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी योग्य वेळ आहे. त्याचप्रमाणे आजही (मंगळवारी) सोन्याच्या किंमतीत किंचित घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात मात्र वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव 45,261 रुपये प्रति तोळावर होता. तसेच, चांदीची किंमत (Silver) 58,710 रुपये प्रति किलोवर होती. या दोन्हीत देखील बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price Today)
आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या किरकोळ घसरणीनंतर सोन्याचा दर 1,761 डॉलर प्रति औंस आहे. तसेच, आज (मंगळवारी) सोन्याच्या दरात 3 रुपयांनी झाली आहे. या किंचित घसरणीनंतर सोन्याचा भाव 45,258 रुपये प्रति तोळावर पोहचला आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

आजचा चांदीचा भाव – (Silver Price)
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किंमतीत विशेष बदल झालेला नाही. ग्लोबल मार्केटमध्ये (Global Market) चांदीची किंमत 22.42 डॉलर प्रति औंसवर आहेत. आज (मंगळवारी) चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी चांदीच्या दरात 40 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. यानंतर चांदीचा भाव 58,750 रुपये प्रति किलोवर आहे.

दरम्यान, फेडरल ओपन मार्केट कमिटीची दोन दिवसीय बैठक आज सुरू होणार आहे.
अशावेळी गुंतवणूकदार बैठकीच्या निर्णयाची आणि फेड अधिकाऱ्यांच्या निवेदनाची वाट पाहत आहेत. आज सकाळी फॉरेक्‍स मार्केटमध्ये डॉलरच्या तुलनेत 15 पैशांच्या वाढीनंतर रुपया 73.59 च्या पातळीवर व्यवहार करत होता. अशी माहिती Senior Analyst at HDFC Securities (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिली.

Web Titel :- Gold Price Today | gold price today dropped and silver gains check todays latest price of gold and sliver.

 

Mayor Muralidhar Mohol | पुणेकरांसाठी खुशखबर ! आता ‘पुण्यदशम’ने प्रवासादरम्यान ‘आधारकार्ड’ची सक्ती रद्द !

Pune News | पुण्यामध्ये सर्वाधिक हिंजवडी, वाकड, म्हाळुंगे, ताथवडे, बाणेर, सूस, बालेवाडी या परिसरात गृह खरेदी; शहरात 8 टक्क्यांनी घरांच्या खरेदीमध्ये वाढ

PMC GB Meeting | पुणे मनपात निधीसाठी विरोधकांकडून गाणी गाऊन ‘आयुक्तांकडे’ विनवणी; तर सत्ताधाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Javed Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा आरोप; म्हणाली – ‘कोर्टावरील विश्वास उडाला’

The post Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित घट तर चांदी वधारली, जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article