Kaun Banega Crorepati | सावधान ! ‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाखील पाकिस्तानी हॅकर करताहेत फसवणूक, चुकूनही ‘हा’ नंबर ग्रुपमध्ये अॅड करु नका

पुणे / पिंपरी :बहुजननामा ऑनलाईन – Kaun Banega Crorepati |कौन बनेगा करोडपतीच्या (Kaun Banega Crorepati) प्रशासकीय विभागातून बोलत असल्याचे सांगून हॅकर (Hacker) नागरिकांची फसवणूक (Cheating) करत असल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. आता पाकिस्तानमधील (Pakistan) काही हॅकर कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाच्या नावाखाली भारतीयांची फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानी व्हॉटसअॅप क्रमांकावरुन (WhatsApp number) एका तरुणीला व्हिडिओ आला, यामध्ये तुम्ही 25 लाख रुपये जिंकले असल्याचे सांगून हा क्रमांक तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रुपला अॅड करा असे सांगण्यात आले. मुलीला संशय आल्याने तिने चौकशी केली असता हा क्रमांक पाकिस्तानमधील असल्याचे निष्पन्न झाले.
पिंपरी चिंचवड मधील एका 24 वर्षीय तरुणीला तिच्या मोबाइल फोनवर एका अनोळखी नंबरवरुन एक व्हिडिओ आला होता. कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून तुम्ही 25 लाख जिंकले असल्याचे व्हिडिओत सांगण्यात आले. तसेच हा नंबर तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करा, आणि फोन करुन अधिक माहिती घ्या असे सांगण्यात आले होते. तरुणी उच्च शिक्षित असल्याने तिने घरच्यांना हा प्रकार सांगून सल्ला घेतला. त्यावेळी हा व्हिडिओ बनावट (fake Video) असून ज्या क्रमांकावरुन हा व्हिडिओ आला आहे तो क्रमांक पाकिस्तानी असल्याचे निष्पन्न झाले. (Kaun Banega Crorepati)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सायबर गुन्हे शाखेचे (Cyber Crime Branch) वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार (Senior Police Inspector Sanjay Tungar) यांनी सांगितले की, हा हॅकिंगचा प्रकार असून नागरिकांनी अशा अमिषांना बळी न पडता त्याकडे दुर्लक्ष करावे. तसेच तुम्ही जर तो क्रमांक ग्रुपमध्ये अॅड केला तर हॅकर तुमचा डेटा हॅक करु शकतात. यातून नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक होऊन हॅकर खासगी गोष्टी पाहू शकतात. खाजगी फोटोच्या माध्यमातून फसवणूक होऊ शकते, असे तुंगार यांनी सांगितले.
हा क्रमांक ग्रुपमध्ये अॅड करु नका
+923234548540 (हा क्रमांक पाकिस्तानचा आहे.)
8874104431 (हा व्हॉट्सअॅप क्रमांक चुकूनही ग्रुपमध्ये अॅड करु नका)
Web Title :- Kaun Banega Crorepati | scam can happen in the name of kaun banega crore pati pakistani hacker can do fraud.
The post Kaun Banega Crorepati | सावधान ! ‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाखील पाकिस्तानी हॅकर करताहेत फसवणूक, चुकूनही ‘हा’ नंबर ग्रुपमध्ये अॅड करु नका appeared first on बहुजननामा.