Header

Kolhapur Megholi Irrigation Project | कोल्हापुरातील मेघोली प्रकल्प फुटला; महिलेचा मृत्यू, अनेक जनावरे दगावली

Kolhapur Megholi Irrigation Project | कोल्हापुरातील मेघोली प्रकल्प फुटला; महिलेचा मृत्यू, अनेक जनावरे दगावली

Kolhapur Megholi Irrigation Project | leakage in megholi irrigation project a woman washed away in water

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – Kolhapur Megholi Irrigation Project | ओढ दिलेल्या पावसाने पुन्हा बरसण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या (Kolhapur Megholi Irrigation Project) भिंतीला गळती लागली होती. मध्यरात्री प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागून अखेर बंधारा फुटला. पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर शेकडो एकर शेतजमीन वाहून गेली आहे. तर अनेक जनावरे दगावली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बंधाऱ्याचे आउटलेट आहे त्या शेजारून बंधारा फुटला आहे. बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.गळतीमुळे संपूर्ण रात्रभर ग्रामस्थांनी जागून काढली.

दरम्यान, बंधारा फुटल्याने वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातून १२ नद्या वाहतात. त्यामुळे विविध लघु पाटबंधारे सुद्धा बांधण्यात आले आहेत.काही वर्षांपूर्वीच मेघोली धरण बांधण्यात आल होत. त्याला गळती लागल्याची माहिती पूर्वीच प्रशासनाला दिली गेली होती.

Web Title : Pune Crime | Court orders to file charges against 43 lakh, 5 people

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Modi Government | खुशखबर ! आता सरकार मजूरांना दर महिना देणार 3,000 रुपये पेन्शन! ‘या’ पध्दतीनं करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या

CBI Officer Arrest | अनिल देशमुख यांच्या क्लिन चिटप्रकरणी सीबीआयनं केली CBI च्या अधिकार्‍याला अटक, जाणून घ्या नेमकं काय झालं

Actor Siddharth Shukla | अभिनेता आणि Bigg Boss चा विजेता सिध्दार्थ शुक्लाचं 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळं मुंबईत निधन 

The post Kolhapur Megholi Irrigation Project | कोल्हापुरातील मेघोली प्रकल्प फुटला; महिलेचा मृत्यू, अनेक जनावरे दगावली appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article