Header

Petrol Diesel Price | दोन दिवसात पेट्रोल प्रति लिटर 42 पैशांनी तर डिझेल 57 पैशांनी महागले

Petrol Diesel Price | दोन दिवसात पेट्रोल प्रति लिटर 42 पैशांनी तर डिझेल 57 पैशांनी महागले

Petrol diesel price in two days petrol became costlier by 42 paise per liter and diesel by 57 paise.

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Petrol Diesel Price | कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी उंच गगनाला भिडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसात पेट्रोल प्रति लिटर ४२ पैशांनी तर, डिझेल लिटरमागे ५७ पैशांनी महागले (Petrol Diesel Price) आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीमुळे एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने इंधनाची दरवाढ रोखून धरली होती. त्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीपासून इंधनाची दरवाढ होऊ लागली. पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली. त्यानंतर गेल्या काही दिवसात पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीला आळा बसला होता. एक दोनदा तर चक्क दरकपातही झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा भाववाढ (Petrol Diesel Price) होण्यास सुरुवात झाली आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

बुधवारी पेट्रोलमध्ये १७ पैशांनी तर डिझेलमध्ये २६ पैशांनी लिटरमागे वाढ झाली होती.
गुरुवारी पेट्रोल प्रति लिटर २५ पैशांनी महागले आहे. पुणे शहरात आता पेट्रोलचा दर १०७.२५ रुपये लिटर झाला आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
डिझेलचा दर ९५.५७ रुपये लिटर इतका झाला आहे.

पॉवर पेट्रोलच्या दरात दोन दिवसात ४० पैशांची वाढ झाली आहे.
आता पुणे शहरात पॉवर पेट्रोलचा दर ११०.९२ रुपये लिटर झाला आहे.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढू लागल्याने देशात पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी ८ ते १० रुपयांची पुढील काळात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

web title: Petrol diesel price in two days petrol became costlier by 42 paise per liter and diesel by 57 paise.

 

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार ! शारीरीक संबंधाचे ‘विवस्त्र’ फोटो व्हायरल करण्याची धमकी

Driving Licence New Rules 2021 | दिलासादायक ! ‘DL’साठी आता RTO कडे जायची गरज नाही; ‘या’ संस्था देखील देणार परवाना

Aadhaar Card | ‘आधार’शी संबंधित नियमांत मोठे बदल, जाणून घ्या फायदा होणार की नुकसान

Heart Health | हृदयाच्या आजारांपासून वाचवतील खाण्याच्या ‘या’ 10 गोष्टी, आहारात नक्की करा समाविष्ट; जाणून घ्या

The post Petrol Diesel Price | दोन दिवसात पेट्रोल प्रति लिटर 42 पैशांनी तर डिझेल 57 पैशांनी महागले appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article