PM Kisan Samman Nidhi | खुशखबर ! शेतकर्यांच्या खात्यात 6000 ऐवजी येतील पूर्ण 36000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – PM Kisan Samman Nidhi | तुम्ही सुद्धा शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तुम्हाला थेट 36000 रुपयांचा फायदा होऊ शकतो. मोदी सरकार (Modi government) पीएम किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत शेतकर्यांच्या खात्यात वर्षाला थेट 6,000 रुपये ट्रान्सफर करते.
जाणून घ्या कसे मिळतील 36,000 रुपये
PM kisan Man dhan Yojna अंतर्गत शेतकर्यांना पेन्शन देते. या योजनेंतर्गत शेतकर्याचे वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहिना 3,000 रुपये पेन्शन (Kisan pension) मिळते. तुम्ही पीएम किसान योजनेत सहभागी असाल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.
कोण घेऊ शकतात या योजनेचा लाभ
– 18 ते 40 वर्षापर्यंतचा कोणताही शेतकरी लाभ घेऊ शकतो.
– यासाठी तुमच्याकडे कमाल 2 हेक्टेरपर्यंत शेतीयोग्य जमीन असावी.
– किमान 20वर्ष आणि कमाल 40 वर्षापर्यंत 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत मासिक अंशदान करावे लागेल, शेतकर्याच्या वयावर अवलंबून आहे.
– जर 18 व्या वर्षी सहभाग घेतला तर मासिक अंशदान 55 रुपये असेल.
– 30 व्या वर्षी सहभाग घेतला तर 110 रुपये जमा करावे लागतील.
– जर तुम्ही 40 च्या वयात सहभागी झालात तर दरमहिना 200 रुपये जमा करावे लागतील.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जाणून घ्या कधी येतो हप्ता?
पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान येतो. दुसरा हप्ता थेट 1 एप्रिल ते 31 जुलै आणि तिसरा 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत शेतकर्यांच्या खात्यात वर्ग केला जातो. (PM Kisan Samman Nidhi)
Web Title : PM Kisan Samman Nidhi | good news farmers will get 36000 rupees under pm kisan schemes check how details here.
The post PM Kisan Samman Nidhi | खुशखबर ! शेतकर्यांच्या खात्यात 6000 ऐवजी येतील पूर्ण 36000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ? appeared first on बहुजननामा.