Header

PM Mandhan Yojana | 55 रुपये खर्च केल्यास दरमहा बँक अकाऊंटमध्ये येतील 3000 रुपये, जाणून घ्या पूर्ण स्कीम

PM Mandhan Yojana | 55 रुपये खर्च केल्यास दरमहा बँक अकाऊंटमध्ये येतील 3000 रुपये, जाणून घ्या पूर्ण स्कीम

PM Maandhan Yojana | If you spend Rs 55, you will get Rs 3000 per month in your bank account, find out the full scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Maandhan Yojana | जर तुम्ही पीएम किसान सम्मान निधीचे लाभार्थी आहात तर ही बातमी तुमच्यासाठी खुप कामाची आहे. कारण सरकार अशा पात्र लोकांना आता मोठा फायदा देत आहे. सरकार या योजनेतील शेतकर्‍यांना 3000 रुपये महीना म्हणजे 36000 रुपये पेन्शन (PM Maandhan Yojana) देत आहे.

या योजनेचा फायदा अशा शेतकर्‍यांना मिळेल ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे. केंद्र सरकारकडून पीएम किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजना चालवली जाते, ज्या अंतर्गत वार्षिक 6000 रुपये खात्यात येतात.

मोदी सरकारच्या (Modi Government) या योजनेचा लाभ त्या सर्व शेतकर्‍यांना मिळू शकतो, जे पीएम किसान सम्मान निधीचा लाभ घेत आहेत. तर, पीएम किसान सम्मान निधी योजनेतून सुमारे 11 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांना हप्ता मिळत आहे. पीएम किसानच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड आणि पीएम किसान मानधन योजनेचा (PM Mandhan Yojana) लाभ देत आहे.

पेन्शनसाठी आवश्यक अटी

केंद्र सरकारकडून देशातील छोट्या आणि सीमांत शेतकर्‍यांसाठी प्रधानमंत्री मानधन योजना (PM mandhan yojana) पेन्शन योजना चालवली जात आहे. यामध्ये 60 व्या वर्षानंतर दरमहीना 3000 रुपयांची सुविधा दिली जाते.

जर एखादा शेतकरी पीएम किसान सम्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) चा घेत असेल तर त्याला यासाठी कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाहीत. या योजनेंतर्गत शेतकरी पीएम किसानमधून प्राप्त लाभातून थेट अंशदान करण्याचा पर्याय निवडू शकतो. अशाप्रकारे त्यास थेट आपल्या खिशातून पैसे द्यावे लागणार नाहीत.
कोण घेऊ शकतात या योजना फायदा

– 18 ते 40 वर्षापर्यंतचा कोणताही शेतकरी लाभ घेऊ शकतो.
– यासाठी तुमच्याकडे कमाल 2 हेक्टेरपर्यंत शेतीयोग्य जमीन असावी.
– किमान 20वर्ष आणि कमाल 40 वर्षापर्यंत 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत मासिक अंशदान करावे लागेल, शेतकर्‍याच्या वयावर अवलंबून आहे.
– जर 18 व्या वर्षी सहभाग घेतला तर मासिक अंशदान 55 रुपये असेल.
– जर 30 व्या वर्षी सहभाग घेतला तर 110 रुपये जमा करावे लागतील.
– जर तुम्ही 40 च्या वयात सहभागी झालात तर दरमहिना 200 रुपये जमा करावे लागतील.

Web Title : PM Maandhan Yojana | If you spend Rs 55, you will get Rs 3000 per month in your bank account, find out the full scheme

Earn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहीना होईल 1 लाखापेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कसा?

Varsha Gaikwad | शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू ! पालकांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी; सूचनांबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या…

Pune Crime | पुण्यात दुधामध्ये भेसळ ! अन्न औषध प्रशासनाकडून FIR दाखल

The post PM Mandhan Yojana | 55 रुपये खर्च केल्यास दरमहा बँक अकाऊंटमध्ये येतील 3000 रुपये, जाणून घ्या पूर्ण स्कीम appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article