Pune Crime | पुण्यात तरुणावर वार करुन खुन; शिवाजीनगरमधील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | तरुणाच्या डोक्यात व इतरत्र धारदार हत्याराने वार करुन त्याचा खुन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा (Murder) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे (PSI Arjun Naikwade) यांनी फिर्याद दिली आहे. शिवाजीनगर (Shivajinagar) येथील खुडे पुलाखाली ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी अंदाजे ४० वय असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कोणीतरी त्याच्या डोक्यात, कपाळावर, कानावर, गालावर,धारदार शस्त्राने वार करुन खुन केला होता. या तरुणाची अद्याप ओळख पटली नाही.
पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. शवविच्छेदनानंतर आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
web title: Pune crime murder in shivajinagar area.
Modi Government | कोरोना मृतांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये भरपाई मिळणार; केंद्राची SC ला माहिती
दोन पेक्षा कमी नाहीत व चार पेक्षा अधिक नाहीत
The post Pune Crime | पुण्यात तरुणावर वार करुन खुन; शिवाजीनगरमधील घटना appeared first on बहुजननामा.