Header

Pune Crime | महिलेला काम देण्याच्या आमिषाने नेऊन लुबाडले ! डोक्यात दगड घालून केले जखमी, कोंढव्यातील धक्कादायक घटना

Pune Crime | महिलेला काम देण्याच्या आमिषाने नेऊन लुबाडले ! डोक्यात दगड घालून केले जखमी, कोंढव्यातील धक्कादायक घटना

Pune Crime | woman looted in kondhwa area

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | घरातील गरीबीमुळे बिगारी काम करण्यासाठी मजुर अड्ड्यावर आलेल्या महिलेला गवत कापण्याचे काम देतो, असे म्हणून होळकरवाडीतील कानिफनाथ डोंगराजवळ नेऊन डोक्यात दगड घालून चाकूचा धाक दाखवून तिच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने लुबाडण्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी कोंढव्यातील एका 45 वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. ही महिला बिगारी काम करण्यासाठी मजुर अड्ड्यावर बुधवारी सकाळी उभ्या होत्या. यावेळी एक साधारण 30 वर्षाच्या चोरटा त्यांच्याकडे आला. त्याने फिर्यादी महिलेसोबत कामाची मजुरी ठरवून गवत कापण्याकरीता तिला तो होळकरवाडी येथील कानिफनाथ डोंगराजवळील कोणार्क पुरम सोसायटीसमोर आणले. तेथे त्याने फिर्यादीच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. चाकूचा धाक दाखवला. तेव्हा फिर्यादीने हात झटकला असता त्याने त्यांच्या गळ्याला चाकू लावला. त्यांच्याकडील सोन्याच्या कानातील दोन वेल आणि चांदींच्या पट्ट्या असा 61 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यांना जखमी अवस्थेत तेथेच सोडून तो पळून गेला. कोंढवा पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | woman looted in kondhwa area

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Coronavirus | राज्यात ‘या’ दिवसापासून कोरोनाची तिसरी लाट?; गणेशोत्सवापूर्वी ‘निर्बंध’ पुन्हा कडक

Ministry of Defence Recruitment 2021 | सरकारी नोकरीची संधी, 10 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज; 400 पदांसाठी भरती, जाणून घ्या

Heart Disease | आक्रोड खाल्ल्याने कमी होतो हृदय रोगांचा धोका, 8.5% पर्यंत कोलेस्ट्रॉलचा स्तर करते कमी – रिसर्चमध्ये दावा 

The post Pune Crime | महिलेला काम देण्याच्या आमिषाने नेऊन लुबाडले ! डोक्यात दगड घालून केले जखमी, कोंढव्यातील धक्कादायक घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article