Header

Pune Crime | कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक

Pune Crime | कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक

pune crime cheating on a young woman under the pretext of working for a company

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | कंपनीत काम (company Work) देण्याच्या बहाण्याने तरुणीला रोख (Cash) आणि ऑनलाईन (Online) पद्धतीने पैसे भरण्यास सांगितले. पैसे भरून देखील आरोपीने तरुणीला कामावर न ठेवता फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. हा प्रकार शिवणे येथील लाइमलाइट ट्रेन्डस प्रा. लि. (Limelight Trends Pvt. Ltd. Shivane) या कंपनीत घडला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi police) एकाला अटक (Arrest) केली आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

अभिजीत अर्जुन सुतार Abhijeet Arjun Sutar (वय-25 रा. लाइमलाइट ट्रेन्डस प्रा. लि. दांगट इस्टेट, अगरवाल गोडावुन बाजुला शिवणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी समीक्षा सचिन उर्फ राहुल दुधाने (वय-21 रा. अमर भारत सोसायटी, गणपती माथा, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजीत सुतार याने फिर्यादी यांना कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रोख आणि ऑनलाइन दहा हजार रुपये घेतले. पैसे घेऊन देखील आरोपीने फिर्यादी यांना कामावर ठेवले नाही. त्यामुळे तरुणीने आरोपीकडे पैशांची मागणी केली. आरोपीने घेतलेले पैसे परत न करता फिर्यादी यांना ऑफिसमध्ये बसून ठेवले. तसेच दमदाटी करुन सानीका पवार (Sanika Pawar) या नावाने बनावट फेसबुक अकाउंट (Fake Facebook account) काढण्यास सांगितले. या अकाउंटवरुन आरोपीने कंपनीची जाहिरात करण्यास सांगून फिर्यादी यांची फसवणूक केली. पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करीत आहेत.

Web Title : pune crime cheating on a young woman under the pretext of working for a company

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

Pune Crime | ‘जीपीएस’मुळे इलेक्ट्रीक बाईक चोरी झाली ‘उघड’; भाड्याने बाईक घेऊन परस्पर विकणारे गजाआड

LPG Cylinder Price | ‘एलपीजी’ सिलेंडर आजपासून झाला आणखी महाग , आता ‘या’ किमतीत मिळेल घरगुती गॅस; 15 दिवसात 50 रुपयांची वाढ

The post Pune Crime | कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article