Header

Sanjay Raut | संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान; म्हणाले – ‘…तर मला अटक करुन दाखवा’

Sanjay Raut | संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान; म्हणाले – ‘…तर मला अटक करुन दाखवा’

sanjay raut slams chandrakant patil over compounder and governors comment

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर शिवसेना नेता संजय राऊत (Shivsena leader Sanjay Raut) यांनी टीका केली होती, असा आरोप भाजपने (BJP) केला आहे. त्यावर आता स्वत: संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यपालांवर मी टीका केली नाही. भाजपला तसं वाटत असेल तर मला आताच अटक (Arrest) करावी, असे थेट आव्हान त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना दिला आहे. संजय राऊत आज मीडियाशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

…म्हणून ते वैफल्यग्रस्त आहेत
यावेळी बोलताना त्यांनी राज्यपालांवरील टीकेवर स्पष्टीकरण दिले. राज्यपाल आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत आणि राहतील. मी राज्यपालांवर टीका केली नाही. पण, तुमच्या हातात असेल तर मला आता अटक करा, असं थेट आव्हानच त्यांनी दिलं. याशिवाय राऊत यांना चंद्रकांत पाटलांनी कंपाऊंडर म्हणून टोमणा मारला होता. त्यावरही त्यांनी सडकून टीका केली. चंद्रकांत पाटलांनी आपलं मानसिक स्वास्थ्य नीट केलं पाहिजे. सरकार (Government) येत नाही म्हणून ते वैफल्यग्रस्त आहेत, असे राऊत म्हणाले.

आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही
यावेळी राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या एका टीकेलाही उत्तर दिलं. राऊतांच्या दंडात ताकत आहे का ? असा बोचरा सवाल चंद्रकांत पाटलांनी विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) अफजलखानाचा कोथळा काढला, इतिहास समजून घ्या. आमच्या दंडाशी बरोबरी करु नका. आमच्याकडे दंड आणि दंडा दोन्ही ही असतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पाटलांनी चिंता करु नये, सरकार पडणार नाही
चंद्रकांत पाटलांनी काल टीका करताना, राऊत पवारांसाठी काम करतात की शिवसेनेसाठी? असा प्रश्न केला होता. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, कधी काळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) शरद पवारांसाठी (Sharad Pawar) काम करत होते, आज ते देशाचे नेते आहेत. आमचे दोघांशी चांगले संबंध आहेत. शरद पवारांचा पक्ष आणि शिवसेनेची आघाडी आहे. पाटलांनी चिंता करु नये, सरकार पडणार नाही, असं राऊत म्हणाले.

Web Title : sanjay raut slams chandrakant patil over compounder and governors comment

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Petrol Price Today | शुभ वार्ता ! पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा ‘कपात’

Earthquake | कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी भुकंपाचा ‘धक्का’

Earn Money | 2 रुपयांची 2 नाणी तुम्हाला मिळवून देतील 10 लाख रुपये, तुमच्याकडे आहेत का असे Coins?; जाणून घ्या

The post Sanjay Raut | संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान; म्हणाले – ‘…तर मला अटक करुन दाखवा’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article