Shiv Sena MP Bhavana Gawali | शिवसेना खा. भावना गवळी यांच्या अडचणीत आणखी वाढ, जाणून घ्या प्रकरण

वाशीम : बहुजननामा ऑनलाईन – Shiv Sena MP Bhavana Gawali | शिवसेना नेत्या आणि वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्या निकवर्ती असणारा सईद खानला (Saeed Khan) काल ईडीने अटक केली आहे. तोवर आज (बुधवारी) खा. भावना गवळी (Shiv Sena MP Bhavana Gawali) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स बजावला आहे. तसेच (सोमवारी) 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ED कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देखील गवळी यांना देण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय समीकरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे.
27 सप्टेंबर रोजी रात्री भावना गवळी यांचे निकटवर्तीय आणि सहकारी सईद खान (Saeed Khan) यांना अटक केली. यानंतर आज भावना गवळींना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, काही महिन्यापुर्वी ED ने शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या 9 संस्थावर छापेमारी केली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली.
त्याच्यानंतर 27 सप्टेंबर रोजी पाथरी येथे ईडीने कारवाई केली आहे. आणि गवळी यांचे सहकारी सईद खानला अटक केली आहे.
मात्र ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा सईद खान यांचे वकील इंद्रापल सिंह (Advocate Indrapal Singh) यांनी केला. दरम्यान, सईद खान यांना अटक झाल्यानंतर खा. भावना गवळींच्या अडचणीत वाढे होणार अशी चर्चा रंगच असतानाच आज ईडीने त्यांना समन्स बजावला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, ED ने 30 ऑगस्ट रोजीही वाशीम जिल्हय़ातील रिसोड व इतर ठिकाणच्या भावना गवळी यांच्या संस्थांमध्ये झडती घेतली होती.
भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गवळींवर 100 कोटींच्या घोटाळयाचा आरोप केला आहे. त्यानंतर, गवळी यांच्या 2 निकटवर्तीय सहकाऱ्यांना ED समोर हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली होती.
महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशीसंबंधी आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी 2 व्यक्तींना ED ने समन्स पाठवलं होतं.
Web Title : shiv sena mp bhavana gawali summoned by ed.
Crime News | पोटात 42 लाखाचे सोने लपवून दिल्लीला निघाला होता ‘तस्कर’, विमानतळावर ‘गोत्यात’
The post Shiv Sena MP Bhavana Gawali | शिवसेना खा. भावना गवळी यांच्या अडचणीत आणखी वाढ, जाणून घ्या प्रकरण appeared first on बहुजननामा.