Header

Stock Market | शेयर बाजारातून कमावण्याची संधी ! 70 आयपीओ रांगेत, 28 कंपन्यांनी जमवले 42000 कोटी

Stock Market | शेयर बाजारातून कमावण्याची संधी ! 70 आयपीओ रांगेत, 28 कंपन्यांनी जमवले 42000 कोटी

stock market share market giving golden opportunity to make money with ipo market boom 70 ipo in pipeline this year

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – Stock Market | सध्या शेयर बाजार नवीन विक्रम बनवत आहे. सेन्सेक्स 60 हजाराचा ऐतिहासिक स्तर (Sensex Historical High) गाठला आहे. मागील सात महिन्यात सुमारे 28 कंपन्यांनी आयपीओमधून सुमारे 42 हजार कोटी रुपये जमवले (Stock Market) आहेत.

यामध्ये स्टार्टअप कंपनी झोमॅटो (Zomato), तत्व चिंतन फार्मा (Tattva Chintan Pharma), ग्लेनमार्क लाईफ सायन्स (Glenmark Life science), सालासार टेक्नॉलॉजीस (Salasar Technologies), पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीस (Paras Defence and Space Technologies) सारख्या आयपीओंचा समावेश आहे. (Stock Market)

IPO Market : 70 आयपीओ रांगेत

आगामी दिवसात अनेक आकर्षक आयपीओ रांगेत असणार आहेत. स्वस्त हॉटेल उपलब्ध करून देणारी स्टार्टअप कंपनी ओयो हॉटेल्स अँड रूम्स (OYO IPO) ने काही दिवसांपूर्वी बाजार नियामक सेबी (Securities and Exchange Board of India / SEBI) कडे आयपीओचे कागदपत्र जमा केले आहेत. ओयो हॉटेल्स अँड रूम्स कंपनी एक अरब डॉलरपेक्षा जास्तचे आयपीओ आणण्याची तयारी करत आहे.

पेटीएम आणि ओलाचे सुद्धा आयपीओ येणार

याशिवाय आगामी काळात आपल्याला पेटीएम (Paytm IPO), Nykaa, ओला (Ola IPO) सारख्या स्टार्टअप कंपन्यांचे आयपीओ सुद्धा पहायला मिळतील. या वर्षाच्या उर्वरित भागात आपण अशाप्रकारचे जवळपास 70 कंपन्यांचे आयपीओ बाजारात तरंग निर्माण करताना पाहू शकतो.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 किरकोळ गुंतवणुकदरांना सुद्धा मोठी कमाई

हे आयपीओ कंपन्यांना पैसे जमा करण्यात मदत करतात, तसेच किरकोळ गुंतवणुकदारांना सुद्धा मोठी कमाई करण्याची संधी देतात. मागील दिवसात सादर झालेले आयपीओंचे आकडे हे सिद्ध करतात.

2 ते 3 पट रिटर्न देणारे IPO

तत्व चिंतन फार्मा, जीआर इन्फ्रा (GR Infraprojects), केमकॉन स्पेशियलिटी केमिकल्स (Chemcon Specialty Chemicals), हॅप्पिएस्ट माईंड्स टेक्नॉलॉजीस (Happiest Minds Technologies), रूट मोबाईल (Route Mobile), क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (Clean Science &Technology) सारख्या आयपीओंनी 100 टक्के रिटर्नचा स्तर मिळवला आहे. या आयपीओंनी गुंतवणुकदारांना दोन ते तीन पट रिटर्न दिला आहे.

10 महिन्यात उघडली गेली एक कोटीपेक्षा जास्त Demat Account

किरकोळ गुंतवणुकदार कशाप्रकारे आयपीओ बाजारातून पैसा कमावत आहेत, याची झलक डिमॅट अकाऊंट उघडण्यात आलेल्या तेजीवरून समजते. सेबीचे आकडे सांगतात की, एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 च्या दरम्यान एक कोटीपेक्षा जास्त नवीन डिमॅट अकाऊंट उघडले.
ही खाती सेकंडरी मार्केटमध्ये पैसे लावत आहेत आणि आयपीओमध्ये सुद्धा रस दाखवत आहेत.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या www.bahujannama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

web title: Stock market share market giving golden opportunity to make money with ipo market boom 70 ipo in pipeline this year.

 

Home Loan Tips | पहिल्यांदा घर खरेदी करणार्‍यांसाठी अतिशय कामाच्या आहेत ‘या’ होम लोन टिप्स, तुम्हीही जाणून घ्या

Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! 27060 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे नवीन दर

Pune Crime | ‘वास्तूशोध’च्या बिल्डर कुलकर्णी बंधूंवर फसवणूक प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

High Return Stocks | ‘हे’ शेयर्स करताहेत पैशाचा वर्षाव! करा इथं ‘इन्व्हेस्ट’, एका झटक्यात होईल मोठी कमाई; जाणून घ्या

The post Stock Market | शेयर बाजारातून कमावण्याची संधी ! 70 आयपीओ रांगेत, 28 कंपन्यांनी जमवले 42000 कोटी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article