Header

MP Udayanraje Bhosale | ‘हात जोडून विनंती करतो, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा’

MP Udayanraje Bhosale | ‘हात जोडून विनंती करतो, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा’

MP Udayanraje Bhosale | MP udayanraje bhosale angry over satara district bank denied to give him information about ed notice to bank

सातारा :बहुजननामा ऑनलाइन –   MP Udayanraje Bhosale | सभासदांची जिरवू नका माझी जिरवायची असेल तर जिरवा. अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी शनिवारी दिली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने (Satara District central co operative bank) जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जवाटप प्रकरणी बँकेला ED ची नोटीस आली. या नोटीसबाबत खा. उदयनराजे यांनी बँकेकडे माहिती मागत विचारणा केली. पण, बँकेच्या संचालकांनी ही माहिती देण्यास नकार दिला. यानंतर उदयनराजे हे चांगलेच संतापले.

 

हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला या संदर्भात माहिती देऊ शकत नाही. असं बँकेच्या संचालक मंडळाने उदयनराजे यांना सांगितले.
त्यावर उदयनराजेंनी (MP Udayanraje Bhosale) संतप्त प्रतिक्रिया दिली.
त्यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले की, बँक ही टिकून रहावी असं मला वाटत आहे.
मला माहिती आहे की, मी बोलत असताना अनेकांना वाटत असेल की खूप मस्ती आलीय.
माझी नका जिरवू, मेहरबानी करा, माझी विनंती आहे, मी तुमचा कोणाचा दुश्मन नाहीये.
हात जोडून विनंती करतो. ही बँक शेतकरी आणि शेतकरी सभासदांची आहे. या गोरगरीब शेतकरी सभासदांच्या वतीने विनंती करतो ही बँक राहू द्या.
ही बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. सभासदांची जिरवू नका माझी जिरवायची असेल तर जिरवा. असं उदयनराजे म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले की, मी जे हे काही करतोय त्यात माझा स्वार्थ काय आहे ? ते कोण मला पॅनलमध्ये घेणारे, मी ठरवतो कुठं जायचं.
परिणामांना मी घाबरत नाही, जे व्हायचंय ते होऊ द्या. हे सर्व करत असताना माझा स्वार्थ काय आहे ते सांगा. मी कोणाच्या विरोधात बोलत नाही.
मी शेतकऱ्यांच्या हिताचं बोलतोय असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : MP Udayanraje Bhosale | MP udayanraje bhosale angry over satara district bank denied to give him information about ed notice to bank

 

Major Changes November 1 | लक्ष द्या ! 1 नोव्हेंबरपासून बदलताहेत बँकांचे चार्जेस, रेल्वे टाइम टेबल, गॅस सिलेंडर बुकिंगचे नियम, ई., जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | वाळू व्यावसायिक संतोष जगताप खून प्रकरण : मुख्य सुत्रधार उमेश सोनवणे अटकेत; लोणी काळभोर पोलिसांनी केली कारवाई

Multibagger Stock | 6 रुपयांचा एनर्जी स्टॉक झाला 254 रुपयांचा, वर्षभरात दिला 4,097% चा रिटर्न; गुंतवणुकदारांचे 1 लाख झाले रु. 42 लाख

Post Office Savings Scheme | पोस्ट ऑफिसची बेस्ट योजना ! 5 हजार गुंतवा अन् मॅच्युरिटीनंतर मिळवा 16.25 लाख रुपये

The post MP Udayanraje Bhosale | ‘हात जोडून विनंती करतो, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article