Header

Mumbai Cruise Rave Party | आर्यन खानच्या सेल्फीमधील ‘ती’ व्यक्ती कोण?

Mumbai Cruise Rave Party | आर्यन खानच्या सेल्फीमधील ‘ती’ व्यक्ती कोण?

Mumbai Cruise Rave Party | ncb clarifies man in picture with aryan khan is not ncb officer mumbai news

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Mumbai Cruise Rave Party | रेव्ह पार्टी प्रकरणात (Mumbai Cruise Rave Party) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडीही मिळाली आहे. या प्रकरणामध्ये अनेक मोठ्या हस्तींचा समावेश असल्याचे समोर येत आहे. दरम्यान सध्या सोशल मीडियावर आर्यन खानचा एक सेल्फी व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आर्यन सोबत सेल्फी घेताना दिसत आहे. हि व्यक्ती एनसीबीचा अधिकारी (NCB Officer) असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द एनसीबीनेच यावर स्पष्टीकरण दिले आहे. आर्यनसोबतच्या सेल्फीमधील व्यक्ती हा एनसीबीचा अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचे तपास यंत्रणेने अधिकृतपणे सांगितले आहे.

मुंबईजवळील समुद्रात क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीवर (Mumbai Cruise Rave Party) एनसीबीने छापा टाकून दहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आठपैकी तीन जणांना एनसीबीने अटक केली आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही अटक करण्यात आली. एनसीबीकडून या तिघांना जेजे रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर आर्यन खान, अरबाज सेठ मर्चेंट (arbaaz seth merchantt) आणि मुनमुन धमेचाला (munmun dhamecha) न्यायालयासमोर हजर केले असता एनसीबीची कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, यावेळी क्रूझवर अयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी आर्यन खानला आमंत्रित केल्याचे आर्यनचे वकील सतीश माने-शिंदे (adv satish maneshinde) यांनी सांगितले.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

गुन्ह्यात सहभाग दर्शवणारे साहित्य व्हॉट्सॲप चॅटच्या स्वरूपात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे ड्रग्ज पुरवठादार व तस्करांशी नियमित संबंध असल्याचे समोर आल्याचे एनसीबीने कस्टोडियल अर्जात म्हंटले आहे.
एनसीबीने आर्यन खान विरोधात एनडीपीएस कलम-27 (मादक पदार्थांचे सेवन करणे),
8-सी (मादक पदार्थांचे उत्पादन,मादक पदार्थ ठेवणे, खरेदी करणे किंवा विकणे) अशा अन्य निगडीत कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Web Title :- Mumbai Cruise Rave Party | ncb clarifies man in picture with aryan khan is not ncb officer mumbai news.

 

Pune School Reopen | राजीव गांधी अ‍ॅकॅडमी ऑफ ई-लर्निंगमध्ये विदूषकांसह ‘प्रवेश उत्सव’ साजरा

Ajit Pawar | …तर दिवाळी गोड होऊ देणार नाही, राजू शेट्टींच्या ‘या’ विधानावरुन अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Pune Cyber Crime | पुण्यातील महिलेचे बँक खाते झाले रिकामे; मेसेजवर संपर्क साधणे पडले महागात

Pune News | योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध ! दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – मोहन जोशी

The post Mumbai Cruise Rave Party | आर्यन खानच्या सेल्फीमधील ‘ती’ व्यक्ती कोण? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article