Header

Pune Crime | पुण्यातील भाजप नगसेवक धनराज घोगरे यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल; एका वकिलासह 5 जणांचा समावेश, प्रचंड खळबळ

Pune Crime | पुण्यातील भाजप नगसेवक धनराज घोगरे यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल; एका वकिलासह 5 जणांचा समावेश, प्रचंड खळबळ

pune crime one more case registered against bjp corporator dhanraj ghogre in pune dattawadi police station

पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | महापालिकेतील (PMC) कामे मिळवून देतो, असे सांगून ठेकेदारांकडून ३ लाख रुपये घेतल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात भाजप नगरसेवकाने (BJP Corporator Dhanraj Ghogre) फिर्यादीचे अपहरण करुन कुटुंबाला संपविण्याची धमकी देऊन अ‍ॅफिडेव्हिटवर जबरदस्तीने सह्या घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठेकेदाराने लघवीचा बहाणा करुन कोर्टातून पलायन करुन दत्तवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने हा प्रकार (Pune Crime) उघडकीस आला.

निखील रत्नाकर दिवसे (वय ३२, रा. घोरपडी पेठ) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात Dattawadi Police Station (२४४/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नगरसेवक धनराज घोगरे (BJP Corporator Dhanraj Ghogre), सहदेव लक्ष्मण ढावरे (वय ४२, रा. पर्वती दर्शन), सुरेश तेलंग, विनोद माने पाटील, अ‍ॅड. अतुल पाटील (Adv. Atul Patil), तसेच घोगरे यांच्या कार्यालयात काम करणारे इतर दोघांविरुद्ध ३६३, ४६८, ३४ कलमाखाली गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

महापालिकेत (Pune Corporation)काम मिळवून देतो, असे सांगून नगरसेवक घोगरे यांनी निखील दिवसे यांच्याकडून ३ लाख रुपये घेतले होते.
त्यांनी काम मिळवून न दिल्याने शेवटी दिवसे यांनी पैसे परत मागितले.
तेव्हा घोगरे व इतर चौघांनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती.
त्याबद्दल वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या तक्रारीबाबत बोलण्यासाठी सहदेव ढावरे याने फिर्यादीला फोन करुन पर्वती दर्शनला बोलावून घेतले. त्यानुसार गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दिवसे तेथे गेले. तेव्हा आरोपींनी फिर्यादी व त्यांचे कुटुंबाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. त्यांना मोटारसायकलवरुन अ‍ॅड. अतुल पाटील यांच्या कार्यालयात नेले. तेथे अगोदरच तयार केलेल्या अ‍ॅफिडेव्हिटवर सह्या घेऊन वानवडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी वापरण्यासाठी त्यांना शिवाजीनगर कोर्टात आणले.  फिर्यादी यांनी कोर्टातील नाझर यांना ते अ‍ॅफिडेव्हिट त्यांचे नाही तर फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना संपविण्यासाठी भिती दाखवून दमदाटी करुन जबरदस्तीने करुन घेतले आहे, असे सांगितले व लघवीचा बहाणा करुन दिवसे तेथून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या तावडीतून पळून गेले.

दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सहदेव ढावरे याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक कामठे अधिक तपास करीत आहेत.

 

web title: Pune crime one more case registered against bjp corporator dhanraj ghogre in pune dattawadi police station.

 

Supreme Court | लवकरच लागणार NEET चा निकाल; उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केला रद्द

Life Insurance Fitness Rewards | फिट रहा आणि इन्श्युरन्स प्रीमियमवर सूट मिळवा, जाणून घ्या IRDAI च्या उपक्रमाबाबत

Modi Government | दुचाकीवर 4 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हेल्मेट सक्ती? मोदी सरकारने सूचना अन् हरकती मागवल्या

Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या बहिणीची नवाब मलिकांविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव; पोलीस ठाण्यातही दाखल केली तक्रार

The post Pune Crime | पुण्यातील भाजप नगसेवक धनराज घोगरे यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल; एका वकिलासह 5 जणांचा समावेश, प्रचंड खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article