Header

Pune Crime | पुण्याच्या फुरसुंगीमध्ये मित्राने मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून ‘जिवंत’ जाळलं; हडपसरमध्ये खुनाचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्याच्या फुरसुंगीमध्ये मित्राने मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून ‘जिवंत’ जाळलं; हडपसरमध्ये खुनाचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Pune crime murder in fursungi area hadapsar police arrest one

पुणे :बहुजननामा ऑनलाईन –  Pune Crime | उसने दिलेले पैसे परत न केल्याने चिडून आपल्याच मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील (Pune Crime) फुरसुंगीजवळ गुरुवारी घडला आहे. दरम्यान, उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यु झाला असून हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) खुनाचा गुन्हा (Murder) दाखल केला आहे.

संतोष दादाराव कागदे Santosh Dadarao Kagde (वय ५१, रा. भैरवनाथ मंदिरासमोर, आंबेगाव बुद्रुक) असे मृत्यु पावलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मनोज मोहन कांदे Manoj Mohan Kande (वय २८, रा. संकेत विहार, फुरसुंगी) याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष कागदे आणि मनोज कांदे हे दोघे मित्र होते. मिळेल ते काम करत असत. संतोष कागदे याने मनोजकडून काही उसने पैसे घेतले होते. तो ते पैसे परत देत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते. पैसे परत देत नसल्याने मनोज चिडला होता. आज काही तरी ‘सोक्षमोक्ष’ लावायचा या इराद्याने त्याने गुरुवारी सकाळी १० वाजता फुरसुंगीतील (Fursungi) संकेत विहारजवळ असलेल्या एका विहिरीजवळ संतोषला भेटायला बोलविले होते. संतोष तेथे आल्यावर त्याने पुन्हा पैशाचे विचारले. तेव्हा संतोषने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने मनोजने तुला पेट्रोल टाकून जाळून खलास करतो, असे म्हणून बाटलीतून आणलेले पेट्रोल संतोष याच्या अंगावर ओतले. काडीने पेटवून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात संतोष हे गंभीर भाजले होते.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्यांचा जबाब घेऊन खुनाचा प्रयत्न (Pune Crime) केल्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, उपचार सुरु असताना सायंकाळी साडेपाच वाजता संतोष कागदे यांचा मृत्यु झाला. त्यानंतर पोलिसांनी ३०२ कलमाचा समावेश केला आहे.हडपसर पोलिसांनी मनोज कांदे याला अटक केली असून पोलीस निरीक्षक अडागळे तपास करीत आहेत.

 

web title: Pune crime murder in fursungi area hadapsar police arrest one.

 

Pune Crime | 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार ! पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा; ‘ब्युटीशियन’ला दिली तुकडे तुकडे करुन तुला संपवून टाकण्याची धमकी

CNG |सर्वसामान्यांना मोठा झटका ! नॅचरल गॅसच्या किमतीत तब्बल 62 टक्क्यांनी वाढ, महागणार CNG गॅस

PF Amount Transfer | नोकरी बदलल्यानंतर घरबसल्या ‘या’ पध्दतीनं ट्रान्सफर करा PF, जाणून घ्या एकदम सोपी ऑनलाइन प्रक्रिया

Pune Corporation | वृक्ष छाटणीसाठी पालिका क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं 5 ते 50 हजाराचं ‘रेटकार्ड’ ! नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांच्याकडून ‘स्थायी समितीच्या’ बैठकीत ‘भांडाफोड’

The post Pune Crime | पुण्याच्या फुरसुंगीमध्ये मित्राने मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून ‘जिवंत’ जाळलं; हडपसरमध्ये खुनाचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article