Header

Pune Crime | वाळू व्यावसायिक संतोष जगताप खून प्रकरण : मुख्य सुत्रधार उमेश सोनवणे अटकेत; लोणी काळभोर पोलिसांनी केली कारवाई

Pune Crime | वाळू व्यावसायिक संतोष जगताप खून प्रकरण : मुख्य सुत्रधार उमेश सोनवणे अटकेत; लोणी काळभोर पोलिसांनी केली कारवाई

Pune Crime | Sand businessman Santosh Jagtap murder case: Umesh Sonawane arrested; Loni Kolbhor police took action.

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  – Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) उरुळी कांचन (uruli kanchan) येथे वाळू व्यावसायिक (sand traders) संतोष जगताप (Santosh Jagtap) याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यात जगताप जागीच ठार (Murder Case) झाला, तर 2 अंगरक्षक गंभीर जखमी झाले होते. प्रत्युत्तरादाखल जगताप याच्या अंगरक्षकांनी गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला. तसेच इतर पळून गेले होते. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सुत्रधार उमेश सोपान सोनवणे (Umesh Sopan Sonawane) यास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) त्याला अटक (Arrested) केली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

या प्रकरणातील मुख्य सुत्रधार उमेश सोनवणे यास अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांनी दिली आहे. दरम्यान, त्यापैकी पवन मिसाळ (Pawan Misal) आणि महादेव आदलिंग (Mahadev Aadling) या दोघांना पळसदेव (ता. इंदापूर) येथून अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहिती वरून या हल्ल्यात मुख्य सूत्रधार उमेश सोनवणे असल्याचा खुलासा झाला होता. मात्र, तो हाती लागला नव्हता. यावर वरिष्ठ पीआय मोकाशी यांनी सोनवणे याला पकडण्यासाठी तपास पथकास सूचना दिल्या. तसेच, त्यांनी पथकासह तेथे सापळा रचून त्यास अटक करण्याच्या सूचना दिल्या. यावर पथकासह राजू महानोर (API Raju Mahanor) तेथे पोहोचले व मिळालेल्या माहितीनुसार उमेश सोनवणे तेथे आला असता पोलिसांनी त्यास ताब्यात (Pune Crime) घेतले.

अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहाय्यक आयुक्त कल्याणराव विधाते (ACP Kalyanrao Vidhate) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पीआय राजेंद्र मोकाशी (Sr PI Rajendra Mokashi), पीआय सुभाष काळे (PI Subhash Kale), , एपीआय राजू महानोर (API Raju Mahanor), पीएसआय प्रमोद हंबीर (PSI Pramod Hambir), पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक सुनील नागलोत, अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव, संभाजी देवकर, पोलीस शिपाई बाजीराव वीर, निखिल पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  Pune Crime | Sand businessman Santosh Jagtap murder case: Umesh Sonawane arrested; Loni Kolbhor police took action.

 

Multibagger Stock | 6 रुपयांचा एनर्जी स्टॉक झाला 254 रुपयांचा, वर्षभरात दिला 4,097% चा रिटर्न; गुंतवणुकदारांचे 1 लाख झाले रु. 42 लाख

Post Office Savings Scheme | पोस्ट ऑफिसची बेस्ट योजना ! 5 हजार गुंतवा अन् मॅच्युरिटीनंतर मिळवा 16.25 लाख रुपये

Narayan Rane | नारायण राणेंचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल, म्हणाले – ‘शिवसेनेत परब हे ‘कलेक्टर’ असल्यामुळे…’

SBI Alert | एसबीआयच्या 44 कोटी ग्राहकांसाठी कामाची बातमी ! बँकेकडून येत असलेल्या ‘या’ मेसेजकडे द्या लक्ष, जाणून घ्या काय करावे?

The post Pune Crime | वाळू व्यावसायिक संतोष जगताप खून प्रकरण : मुख्य सुत्रधार उमेश सोनवणे अटकेत; लोणी काळभोर पोलिसांनी केली कारवाई appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article