Header

Pune News | योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध ! दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – मोहन जोशी

Pune News | योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध ! दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – मोहन जोशी

Pune News | Yogi government doing wrong things ! People's voice cannot be suppressed by repression - Mohan Joshi.

पुणे :बहुजननामा ऑनलाईन –  Pune News | शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (priyanka gandhi) यांना उत्तर प्रदेशातील भ्याड योगी आदित्यनाथ सरकारने (yogi adityanath government) पोलीसांकरवी ताब्यात घेतले ही कृती अत्यंत निषेधार्ह असून दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही, असा इशारा माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी दिला (Pune News)आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर (lakhimpur kheri) येथे आंदोलक शेतकऱ्यांवर रविवारी गोळीबार करण्यात आला, त्यात १० जण मृत्यूमुखी पडले.
मोदी सरकारच्या अन्याय्य कृषी कायद्याच्या विरोधात गेले काही महिने शांततेच्या मार्गाने शेतकरी लढा देत आहेत. पोलीसी बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न योगी सरकारने चालविला आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

गोळीबारात् बळी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आणि आंदोलक शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंकाजी गांधी लखीमपूरला जाणार होत्या.
परन्तु योगी सरकारने त्यांना पोलीसांमार्फत ताब्यात घेऊन रोखले. ही कृती भ्याडपणाची आहे. अशा दडपशाहीपुढे प्रियंकाजी झुकणार नाहीत याची खात्री आहे.
आणि देशातील सर्व काँग्रेसजन त्यांच्या पाठिशी आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

काँग्रेस पक्षांचे मुख्य मंत्री, नेते तसेच अन्य पक्षाच्या नेत्यांना लखीमपूरमध्ये प्रवेशासाठी प्रतिबंध केला जात आहे, ही बाबही संतापजनक असल्याचे जोशी यांनी म्हटले (Pune News) आहे.

 

Web Title : Pune News | Yogi government doing wrong things ! People’s voice cannot be suppressed by repression – Mohan Joshi.

 

Pune Crime | पुण्यात लोहगावमधील दोन कुटुंबामध्ये भररस्त्यात ‘राडा’ ! परस्पराविरोधात विनयभंगाच्या तक्रारी करणार्‍या 12 जणांना अटक, कारण ऐकून तुम्ही व्हाल ‘चकीत’

Ramdas Kadam | अनिल परब आणि रामदास कदम यांच्या वादात शिवसेना मध्यस्थी करणार? कदमांची आमदारकी जाणार?

Pune Crime | नोकरी गेल्याने मंदिरात जाऊन दर्शन घेतले, नंतर स्वत:वर वार करुन तरुणानं आपलं जीवन संपवलं

Kolhapur Crime | ‘हनीट्रॅप’व्दारे सोशलवर बदनामी ! 35 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

The post Pune News | योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध ! दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – मोहन जोशी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article