Sabyasachi Mukherjee | मंगळसूत्राची जाहिरात आहे की कामसूत्रची?, फॅशन डिझायनर सब्यसाचीच्या ‘ज्वेलरी’वर युझर्सची टीका

बहुजननामा ऑनलाइन टीम – Sabyasachi Mukherjee | एक मोठा सन असलेला दिवाळी सन काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. यानिमित्त दिवाळीसाठी आवश्यक असणा-या वस्तु वा अन्य साहित्यांची आकर्षक जाहीरात करताना आपणाला पाहायला मिळतात. अशातच दागिन्यांची जाहीरात अधिक मोठ्या प्रमाणात केली जाते. दरम्यान, प्रसिद्ध फॅशन डिझायनर (Fashion Designer) सब्यसाची मुखर्जी देखील (Sabyasachi Mukherjee) आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीमुळे (Advertising) ट्रोल होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सेलिब्रिटीजचे फॅशन डिझायनर सब्यसाचीचे (Sabyasachi Mukherjee) एक नवे ज्वेलरी कलेक्शन सुरू केले आहे.
त्यामुध्ये लेटेस्ट मंगळसूत्र कलेकशनच्या (Sabyasachi Mangalsutra Collection) जाहिरातीचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
मात्र, याच पोस्ट केलेल्या फोटोंवरुन सब्यसाची या चांगल्याच ट्रोल होताहेत. त्यांच्यावर अनेकांकडून टीका होत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोस्ट केलेल्या फोटोत नेमकं काय..
या पोस्टमध्ये सब्यसाची (Sabyasachi Mukherjee) यांनी जो फोटो शेअर केला आहे.
त्यामुध्ये एक जाड्या फिमेल मॉडेलने अंतर्वस्त्रांवर मंगळसूत्र परीधान केले आहे.
मॉडेलसोबत मेल मॉडेलही शर्टलेस दिसतो आहे. सब्यसाची यांनी याच प्रकाराचा दुसरा फोटो देखील शेअर केला आहे.
दरम्यान, मंगलसूत्रांच्या जाहीरातीच्या कॅम्पेनचे हे फोटो पाहून त्यांच्यावर ट्रोलर्स तुटून पडले आहेत. ही मंगळसूत्राची जाहिरात आहे की अंतर्वस्त्राची हेच कळत नाही, अशी टीका एका यूझरने केली आहे. तर सब्यसाची यांच्याकडून अशा कॅम्पेनची अपेक्षा नव्हती अशी प्रतिक्रिया दुसऱ्या युझरने व्यक्त केली आहे.
तुमचे हे दागिने कुणीच खरेदी करणार नाही, कारण हे मंगळसूत्र खरेदी केले तर आपण असे दिसू असे ग्राहकांना वाटेल. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. तसेच, एका यूझरने तर ही मंगळसूत्राची जाहिरात आहे की कामसूत्राची अशी देखील विचारणा केली.
Web Title : Sabyasachi Mukherjee | fashion designer trolled for intimate jewellery collection photos shows mangalsutra with bra.
Pune Crime | शिविगाळ केली म्हणून जन्मदात्या पित्याचा खून; पुण्याच्या मावळ तालुक्यातील घटना
The post Sabyasachi Mukherjee | मंगळसूत्राची जाहिरात आहे की कामसूत्रची?, फॅशन डिझायनर सब्यसाचीच्या ‘ज्वेलरी’वर युझर्सची टीका appeared first on बहुजननामा.