Header

SBI Alert | एसबीआयच्या 44 कोटी ग्राहकांसाठी कामाची बातमी ! बँकेकडून येत असलेल्या ‘या’ मेसेजकडे द्या लक्ष, जाणून घ्या काय करावे?

SBI Alert | एसबीआयच्या 44 कोटी ग्राहकांसाठी कामाची बातमी ! बँकेकडून येत असलेल्या ‘या’ मेसेजकडे द्या लक्ष, जाणून घ्या काय करावे?

 SBI Alert | sbi alert this message coming from the bank know what to do.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Alert | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) मध्ये जर तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट (SBI Alert) केले आहे. मोठ्या संख्येने यूजर्स असल्याने बँक नियमितपणे आपल्या ग्राहकांसोबत सुरक्षा अपडेट शेयर करते. जेणेकरून ग्राहकांना बँक खात्यात फिशिंग, हॅकिंग किंवा फसवणुकीचे प्रयत्न ओळखण्यास मदत होऊ शकते.

 

अलिकडेच काही अशी प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये टेक्स्ट मेसेज लपवणे आणि संवेदनशील बँक ग्राहकांना संवेदनशील माहितीद्वारे फसवणुक करण्याची प्रकरणे समोर आली आहेत.

 

 

 

 

सर्व बँका नियमितपणे आपल्या ग्राहकांना काही प्रकारच्या माहितीसाठी टेक्स्ट मेसेज (SBI Alert) पाठवतात. ग्राहकांना मिळालेले मेसेज बँकेकडूनच पाठवले जातात किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी SBI ने काही टिप्स शेयर केल्या आहेत.

 

बँकेने म्हटले की, एसबीआय ग्राहकांनी नेहमी एसबीआय / एसबीपासून सुरू होणारा शॉर्टकोड तपासला पाहिजे.
उदाहरणार्थ SBIBNK, SBIINB, SBIPSG , SBYONO, बँकेने पुढे आपल्या खातेधारकांना आणि इतर ग्राहकांना अलर्ट केले आहे की,
अज्ञात स्त्रोतांच्या मेसेजवर कोणतीही प्रतिक्रिया (SBI Alert) देऊ नका.

 

टोल फ्री नंबरवर करा फोन
एसबीआयने कस्टमर्स केयरचा नंबर सुद्धा जारी केला आहे.
कोणत्याही माहितीसाठी कस्टमर केयर नंबर्स 1800 11 2211, 1800 425 3800 किंवा 080 26599990 वर संपर्क करा.
बँकेशी संबंधी माहिती सुद्धा घेऊ शकता.

 

Web Title :- SBI Alert | sbi alert this message coming from the bank know what to do.

 

Earn Money | जर तुमच्याकडे असेल हे 5 रुपयांचे नाणे तर असे मिळतील 5 लाख रुपये, जाणून घ्या काय करावे लागेल

31 October | 31 ऑक्टोबरपूर्वी उरकून घेतली ‘ही’ 4 महत्वाची कामे तर होईल फायदा, तात्काळ जाणून घ्या डिटेल्स

Pune Crime | सरबतातून गुंगीचे औषध देऊन 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पुण्याच्या धनकवडी परिसरातील घटना

Mumbai Police Welfare Fund | मुंबई पोलिसांचा खुलासा ! ‘पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी साहित्य मुंबई पोलीस कल्याण निधीतून, राज्य सरकारकडून नव्हे’

The post SBI Alert | एसबीआयच्या 44 कोटी ग्राहकांसाठी कामाची बातमी ! बँकेकडून येत असलेल्या ‘या’ मेसेजकडे द्या लक्ष, जाणून घ्या काय करावे? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article