Header

Amruta Fadnavis | तुम्ही मर्द आहात ना? मग थेट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस

Amruta Fadnavis | तुम्ही मर्द आहात ना? मग थेट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस

amruta fadnavis amruta fadnavis reply to nawab malik over his allegations on devendra fadnavis

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन –  Amruta Fadnavis | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या आरोपांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा. मला मध्ये आणू नका, अशा शब्दांत अमृता फडणवीस (Amruta Fadnavi) यांनी नवाब मलिक यांचे नाव न घेता हल्ला चढवला आहे.

अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्ला चढवला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप स्त्रियांनाही ओढले जात आहे. त्यावर तुमचं काय मत आहे असे विचारण्यात आले. यावर उत्तर देताना त्यांनी टीकास्त्र सोडलं. ज्या स्त्रिया सरळ मार्गाने जात आहेत त्यांना डिवचू नका, असं मी दोन दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. देवेंद्रजींना टार्गेट करायला तेच आज माझ्याबाबतीत केलं गेलं. तुम्ही मर्द आहात ना? डायरेक्ट त्यांना टार्गेट करा. मला मध्ये नका आणू. एक समाज सेविका म्हणून मी माझे विचार प्रकट करत असते आणि करत राहणार. मला कोणीही थांबवू शकत नसल्याचे अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी म्हटले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

जावयाला विचारा कोण कुणाच्या पाठिशी

देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलरच्या (Drugs peddler) पाठिशी असल्याचा आरोप करण्यात आला. यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, त्यांनी त्यांच्या जावयाला विचारवं कोण कुणाच्या पाठिशी आहे. बेनकाब नवाब भी होता है और वो जरुरु होगा. फक्त वेळ यावी लागते, असं सूचक विधान त्यांनी केलं. मी ट्विट केलं. काही लोकांना काहीच सूचत नाही, त्याबद्दल मी ट्विट केलं आहे. जेव्हा एखाद्या माणसात निगेटिव्हिटी आलेली असती तेव्हा तो खराबच विचार करतो. बाकी काही नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

 

web title: Amruta fadnavis amruta fadnavis reply to nawab malik over his allegations on devendra fadnavis.

 

Anil Deshmukh | सलग 13 तासाच्या चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED कडून अटक

BJP Chitra Wagh | चित्रा वाघ यांचं आदित्य ठाकरेंना खरमरीत पत्र; म्हणाल्या – ‘तुमच्या वडिलांनी ‘ही’ वेळ आणलीय’

SSY | दिवाळीत आपल्या मुलीला बनवा लखपती, केवळ 1 रुपयाच्या बचतीवर मिळेल 15 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या कसा?

Honda Activa | अवघ्या 21 हजारात ‘इथं’ मिळतेय देशात सर्वाधिक विकली जाणारी Honda Activa, मिळेल 1 वर्षाची वॉरंटी; जाणून घ्या

The post Amruta Fadnavis | तुम्ही मर्द आहात ना? मग थेट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article