Header

BSNL Diwali Offer-2021 | BSNL कडून दिवाळी ऑफरचा ‘पाऊस’, ‘या’ रिचार्जवर 90 टक्के डिस्काऊंट; संधी एकदाच पुन्हा नाही

BSNL Diwali Offer-2021 | BSNL कडून दिवाळी ऑफरचा ‘पाऊस’, ‘या’ रिचार्जवर 90 टक्के डिस्काऊंट; संधी एकदाच पुन्हा नाही

bsnl diwali offer 2021 bsnl diwali offer 2021 avail 90 percent discount monthly rental ftth customers.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BSNL Diwali Offer-2021 | सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने दिवाळीनिमित्त एक खास ऑफर (BSNL Diwali Offer-2021) आणली आहे. बीएसएनएलने भारतातील नवीन भारत फायबर (FTTH) ब्रॉडबँड ग्राहकांसाठी दिवाळी धमका ऑफर 2021 (BSNL Diwali Offer-2021) जाहीर केली आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीने ग्राहकांसाठी एक विशेष सवलत योजना (Special discount scheme) सुरु केली आहे, याअंतर्गत नवीन ग्राहकांना मासिक शुल्कात तब्बल 90 टक्के डिस्काऊंट मिळू शकतो. हा प्लॅन केवळ नवीन BSNL FTTH ग्राहकांसाठी लागू असणार आहे. ज्यांचे कनेक्शन ऑफर कालावधी दरम्यान अ‍ॅक्टिव्ह असेल.

1 नोव्हेंबरपासून स्कीम सुरू

बीएसएनएल आपल्या FTTH बिझनेस वाढवण्यासाठी आकर्षक ऑफर्स आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्लॅन BSNL FTTH व्यवसायात नक्कीच वाढ आणू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर तुम्हाला BSNLच्या या प्लॅनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही BSNL FTTH चे कनेक्शन BookMyFiber Portal वर किंवा बीएसएनएलच्या Customer Service Centers च्या माध्यमातून बुक करु शकता. ही विशेष डिस्काऊंट स्कीम 1 नोव्हेंबर पासून पुढील 90 दिवसांसाठी आहे. (BSNL Diwali Offer-2021)

या आहेत अटी

एका रिपोर्टनुसार बीएसएनएल 2021 मध्ये सर्व नव्या भारत फायबर कनेक्शनसाठी मासिक शुल्कात 90 टक्क्यांची सूट देणार आहे. मात्र, ग्राहक कोणत्याही योजनेत सर्वाधिक 500 रुपयांची सूट मिळवू शकतात. ग्राहक जो प्लॅन घेतली त्यामध्ये पहिल्या महिन्याच्या बिलात त्यांना कमाल 500 रुपयांची सूट मिळणार आहे. (BSNL Diwali Offer-2021)

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

FTTH प्लॅन सर्व देशात उपलब्ध

BSNL FTTH प्लॅन अंदमान आणि निकोबार टेलिकॉम सर्कल (Andaman and Nicobar Telecom Circle) सोडून देशात सर्वत्र उपलब्ध असणार आहे. या अंतर्गत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉईस कॉलिंगचा लाभ दिला जातो. याशिवाय 300 MBPS पर्यंत स्पीडही उपलब्ध करुन देण्यात येतो. ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बंडल वॉईस कॉलिंगचा लाभ घेता येतो.

 

web title : bsnl diwali offer 2021 bsnl diwali offer 2021 avail 90 percent discount monthly rental ftth customers.

Paytm IPO | पुढील आठवड्यात येत आहे देशातील सर्वात मोठा IPO, तुम्हाला मिळणार कमावण्याची संधी; जाणून घ्या काय आहे प्राईस बँड?

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 54 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Ashish Shelar | ‘परमबीर सिंग गायब होण्यामागे ठाकरे सरकार, ते सापडले तर सरकारचं पितळ उघडं पडेल’; आशिष शेलार यांचा आरोप

Pune Crime | एम.जी. एंटरप्राइजेसच्या अलनेश सोमजी व पत्नी डिंपल सोमजीला दिल्ली कोर्टाकडून 2 दिवसांचे ट्रान्झिट रिमांड

The post BSNL Diwali Offer-2021 | BSNL कडून दिवाळी ऑफरचा ‘पाऊस’, ‘या’ रिचार्जवर 90 टक्के डिस्काऊंट; संधी एकदाच पुन्हा नाही appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article