Header

Chandrakant Patil | अमृता फडणवीसांवरील टीकेवरून चंद्रकांत पाटलांचे उत्तर, म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांनी कधी कोणाच्या बायकोवर आरोप केले का?’

Chandrakant Patil | अमृता फडणवीसांवरील टीकेवरून चंद्रकांत पाटलांचे उत्तर, म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांनी कधी कोणाच्या बायकोवर आरोप केले का?’

chandrakant patil bjp leader devendra fadnavis ever accuse anyone wife chandrakat patil reply to the criticism on amrita fadnavis

मुंबई :बहुजननामा ऑनलाइन –  Chandrakant Patil | राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) भाजपा (BJP) आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचा एक फोटो ट्विट केला आहे. यानंतर ही व्यक्ती जयदीप राणा असल्याचं सांगत त्याच्यावर गंभीर आरोप केले. तसेच फडणवीस आणि राणा यांचा ड्रग्ज व्यवसायाशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया देत नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीसांनी कधी कोणाच्या बायकोवर आरोप केले का? रोज उठून अमृता फडणवीसांवर आरोप करत आहात. त्यांनी किती संयम बाळगायचा? आमच्याकडून राऊत किंवा पवार साहेबांच्या कुटुंबियांवर कोणी बोलले नाही. दरवेळी तुम्हाला बोलण्यासाठी अमृता फडणवीसांचे नाव का लागते? त्या शांत राहतात त्यामुळे आम्हाला वाईट वाटते. तुम्ही शांत का बसता असे विचारल्यावर त्या ठीक आहे, मोदींकडून काही शिकले पाहिजे की नाही असे म्हणतात. मोदी कधी बोलत नाही, पत्रकार परिषद घेत नाही. शांतपणे काम करत असतात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, सरकारमध्ये असतानाही शिवसेनेची बाहेर पडण्याची हिंमत नव्हती. त्यावेळी ते कोरे कागद घेऊन फिरायचे. राज्यात ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे त्याची सुरुवात कोणी केली ते एकदा तपासले पाहिजे. तुम्ही रोज उठून नरेंद्र मोदींना (Narendra Modi) चौकीदार चोर हे म्हणता, हे चालणार नाही. रोज उठून मोदींना चौकीदार चोर हे म्हणायचे. आई वडिलांपेक्षा सुद्धा श्रद्धा आहे आमची मोदींवर आहे. गप्प बसणार नाही. असंही ते म्हणाले.

Web Title : Chandrakant patil bjp leader devendra fadnavis ever accuse anyone wife chandrakat patil reply to the criticism on amrita fadnavis.

 

CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण…’

Pune Crime | आळंदीतील जोग महाराज शिक्षण संस्थेतील 4 विश्वस्तांवर फसवणुकीचा FIR

Sukanya Samriddhi Yojana | तुमच्या मुलीला कधीही भासणार नाही पैशांची कमतरता ! केवळ 416 रुपये गुंतवून मिळवा 65 लाख, जाणून घ्या

EPFO | जर अजूनही आले नसतील तुमच्या अकाऊंटमध्ये PF च्या व्याजाचे पैसे तर असे तपासू शकता; जाणून घ्या पद्धत

The post Chandrakant Patil | अमृता फडणवीसांवरील टीकेवरून चंद्रकांत पाटलांचे उत्तर, म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांनी कधी कोणाच्या बायकोवर आरोप केले का?’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article