Header

LPG Price 1 Nov | ‘एलपीजी’ सिलेंडर 265 रुपयांनी महागला, दिवाळीपूर्वीच फुटला महागाईचा ‘बॉम्ब’

LPG Price 1 Nov | ‘एलपीजी’ सिलेंडर 265 रुपयांनी महागला, दिवाळीपूर्वीच फुटला महागाईचा ‘बॉम्ब’

lpg price 1 nov lpg price 1 nov lpg cylinder becomes costlier by rs 265 relief to domestic gas consumers

पुणे :बहुजननामा ऑनलाइन –  LPG Price 1 Nov | तेल कंपन्या पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज वाढ करत असल्याने आता गॅस सिलेंडरच्या दरातही (LPG Price 1 Nov) वाढ होणार अशी शक्यता गृहीत धरली जात होती. मात्र, केंद्र सरकारने गॅस सिलेंडरवरील अनुदान कायम ठेवले आहे. १ नोव्हेंबर रोजी घरगुती गॅस सिलेंडरचे दर जाहीर करताना केंद्र सरकारने कोणतीही वाढ केली नाही. मात्र, त्याचवेळी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात (LPG Price 1 Nov) तब्बल २६५ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच महागाईचा ‘बॉम्ब’ फुटला आहे.

ऑक्टोबर महिन्यात गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला नवे दर जाहीर करतात. पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. त्यामुळे आता गॅस सिलेंडरच्या दरातही (LPG Price 1 Nov) वाढ होणार अशी सर्वांची अटकळ  होती. मात्र, नोव्हेंबरसाठी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ न करता ऑक्टोबरचे दर कायम ठेवले आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

वितरकांचा काळा बाजार करण्याचा डाव फसला

गॅस सिलेंडरचे दर वाढणार हे गृहित धरुन गेल्या दोन तीन दिवसांपासून गॅस सिलेंडर वितरकांनी सिलेंडर वितरण जवळपास थांबविले होते. त्यात काल रविवार असल्याने वितरण पूर्ण बंद होते. शेकडो गॅस ग्राहकांना कंपन्यांकडून पावत्याही पाठविण्यात आल्या होत्या. एरवी एका दिवसात गॅस सिलेंडर मिळत असताना सणासुदीच्या दिवसात चार-चार दिवस सिलेंडर मिळत नव्हता. मात्र, घरगुती गॅस सिलेंडरचा दरात वाढ न केल्याने वितरकांचा काळा बाजार करण्याचा डाव फसला आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

घरगुती वापर करणार्‍यांना दिलासा देतानाच सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात २६५ रुपयांची वाढ केली आहे.
त्यामुळे आता दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरचा दर २ हजार रुपये पार गेला आहे.
मुंबईत १९ किलो गॅस सिलेंडर १६८३ रुपये होता. तो आता १९५० रुपये इतका आहे.
कोलकत्ता येथे इंडेन गॅस सिलेंडर २०७३.५० रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये २१३३ रुपये झाला आहे.

web title: lpg price 1 nov lpg price 1 nov lpg cylinder becomes costlier by rs 265 relief to domestic gas consumers.

सावधान ! जर तुम्ही सुद्धा विकत असाल Old Coin किंवा Note तर जाणून घ्या ‘ही’ मोठी बाब, RBI ने जारी केली महत्वाची सूचना

Pune Traffic Jam | पुणे शहर वाहतूक पोलिस नियोजनात ‘फेल’ ! शहरभरातील वाहतूक कोंडीमुळे ऐन दिवाळीत पोलिसांच्या नावाने ‘शिमगा’

Sore Throat | हिवाळ्यात वाढली घशात ‘खवखव’, तर ‘या’ 9 देशी वस्तूंनी मिळेल ताबडतोब आराम; जाणून घ्या

Life Certificate | तुमची पेन्शन SBI मध्ये येते का? घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारे जमा करा जीवन प्रमाणपत्र, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

The post LPG Price 1 Nov | ‘एलपीजी’ सिलेंडर 265 रुपयांनी महागला, दिवाळीपूर्वीच फुटला महागाईचा ‘बॉम्ब’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article