Header

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

Maharashtra Cabinet Decision | extension of submission of caste validity certificate for local body election candidates

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन  –  Maharashtra Cabinet Decision | ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र (caste validity certificate) सादर करण्यासाठी 12 महिन्यांची मुदतवाढ (Extension) देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) घेण्यात आला. त्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीला आपले जात वैधता प्रमाणपत्र 31 डिसेंबर 2022 पर्यंत सादर करता येणार आहे. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेनंतर काढण्यात येणार आहे.

 

राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत. आरक्षित प्रवर्गातून जे उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांनी अर्ज भरताना जात पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याचा आदेश हायकोर्टाने (High Court) दिला आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) महानगरपालिका, नगरपरिषद उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक (Local Body Election) कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर 2022 अथवा त्यापूर्वीचा असणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ज्या व्यक्तीने आपल्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी (Caste Verification Certificate) पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल मात्र अर्ज दाखल करण्याच्या वेळेस त्या व्यक्तीस जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले नसेल अशा उमेदवाराला निवडणुकीत विजय मिळाल्यास 12 महिन्याच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करणार असल्याची हमी द्यावी लागणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास निवड रद्द करण्यात यावी या तरतुदीला देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet Decision)

 

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
महानगरपालिकाप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषद (Zilla Parishad),
पंचायत समितीमध्ये (Panchayat Samiti) जागा वाढवण्यात येणार आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये साधारणपणे 6 ते 7 टक्के जागा वाढणार आहेत.

 

Web Title :- Maharashtra Cabinet Decision | extension of submission of caste validity certificate for local body election candidates.

 

Aurangabad Crime | धक्कादायक ! वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून 40 वर्षीय तलाठ्याची आत्महत्या; सुसाईड करण्यापुर्वी लिहिली चिठ्ठी

Mallaika Arora-Arjun Kapoor | मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरमध्ये वाद, नववर्षाच्या स्वागताला देखील सोबत नसणार

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

Modi Government | ‘हा’ बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार देतंय 2.50 लाख रुपये; पहिल्याच दिवसापासून होईल मोठी कमाई, जाणून घ्या कशी

The post Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article