Header

Parambir Singh | परमबीर सिंह आणखी गोत्यात ! माजी पोलिस आयुक्त सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीवर गृहमंत्रालयाकडून चौकशीचे आदेश

Parambir Singh | परमबीर सिंह आणखी गोत्यात ! माजी पोलिस आयुक्त सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीवर गृहमंत्रालयाकडून चौकशीचे आदेश

Parambir Singh | home minister walse patil likely to give investigation orders on parambir singh and sachin waze meet.

मुंबई :बहुजननामा ऑनलाइन   –  Parambir Singh | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) हे सोमवारी चांदीवाला आयोगासमोर (Chandiwala Commission) हजर झाले होते, दरम्यान, दोघांची केबिनमध्ये तासभर भेट झाली. दोघे कोणाच्या परवानगीने भेटले? याचा तपास मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) होणार अशी चर्चा सुरु होती. यावरुन अखेर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी संबंधित प्रकरणावर चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

गृहमंत्री वळसे पाटील यांनी सचिन वाझे आणि परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या भेटीवर बोलताना मोठा निर्णय घेतला आहे. कालच्या भेटीबद्दल मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, आता या भेटीमुळे वाद निर्माण होणार आहे. दरम्यान, परमबीर यांना पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीवर कोणताही दबाव नाही. असा दबाव असण्याचं काही कारण नाही. परमबीर त्याच्याविरोधात ज्या-ज्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्या ठिकाणी ते जबाब नोंदवत आहेत, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

वाझे मनसुख हिरेन हत्येशी (Mansukh Hiren murder case) संबंधित असल्याने त्याची देखील चांदीवाला आयोगाकडून चौकशी सुरूय.
सुरुवातीला दोघांत काही सेकंद बोलणं झाल्याचं सांगण्यात आलं.
मात्र, दोघेही तासभर सोबत असल्याची माहिती पुढं आली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

दरम्यान, परमबीर यांनी मुंबईतील किल्ला न्यायालयात हजेरी लावली.
या न्यायालयाने परमबीर यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे.
मुंबईच्या गुन्हे शाखेने न्यायालयात परमबीर यांना फरार घोषित करण्याची मागणी केली होती.
तर, न्यायालयीन कोठडीत असताना बाहेरील व्यक्तींना भेटण्याची परवानगी नसते.
परंतु, वाझे आणि परमबीर यांच्यात झालेल्या भेटीवर मुंबईच्या पोलीस आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत,
अशी माहिती गृहमंत्री वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली आहे.

 

Web Title :- Parambir Singh | home minister walse patil likely to give investigation orders on parambir singh and sachin waze meet.

 

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा घणाघात; म्हणाले – ‘शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला’

Pune School Reopen | पुण्यातील पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबरला नाही तर ‘या’ तारखेला सुरु होतील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून माहिती

Saral Pension Yojana | तुम्ही एकदा प्रीमियम देऊन आयुष्यभर मिळवू शकता पेन्शन, जाणून घ्या ‘या’ विशेष योजनेबाबत सर्वकाही

Aishwarya Rai | ऐश्वर्या रायला आलिया भट्टच्या भावानं केलं होतं ‘बेइज्जत’, दोघांमध्ये 36 चा आकडा; जाणून घ्या दुश्मनीचं कारण

The post Parambir Singh | परमबीर सिंह आणखी गोत्यात ! माजी पोलिस आयुक्त सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीवर गृहमंत्रालयाकडून चौकशीचे आदेश appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article