Header

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 54 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 54 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | Comfortable! Discharge of 54 patients of 'Corona' in Pimpri Chinchwad, know other statistics

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 41 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 2628 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 41 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार 283 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 54 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 72 हजार 031 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Pimpri Corona)

शहरात 493 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 493 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात हद्दीबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेल नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4490 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram,
and  facebook page for every update
Facebook

 

दिवसभरात 9019 जणांचे लसीकरण

मंगळवार (दि.02) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 9019 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 23 लाख 35 हजार 657 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona | Comfortable! Discharge of 54 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Anil Deshmukh | विदर्भातील उमद्या नेत्याची कारकीर्द अटकेने ‘काळवंडली’

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा मोठा दावा, म्हणाले – ‘अनिल देशमुखांच्या अटकेनंतर आता पुढचा नंबर…’

Anil Parab | अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा नंबर; भाजपच्या दोन मंत्र्यांचा दावा

Pune Crime | दुचाकीस्वाराला अडवून तलवारीने मारहाण करुन लुटले; पुण्याच्या कोंढव्यातील खडी मशीन चौकात घडला प्रकार

Winter Tips | थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याने होते नुकसान, ‘या’ 10 चूका करणे टाळा; जाणून घ्या

The post Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 54 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article