Header

Pune Coronavirus Restriction | ‘ओमिक्रॉन’च्या धास्तीने पुण्यात पुन्हा निर्बंध ! चित्रपटगृहात 50 % प्रेक्षकांनाच प्रवेश; जाणून घ्या सुधारीत नियम

Pune Coronavirus Restriction | ‘ओमिक्रॉन’च्या धास्तीने पुण्यात पुन्हा निर्बंध ! चित्रपटगृहात 50 % प्रेक्षकांनाच प्रवेश; जाणून घ्या सुधारीत नियम

Pune Coronavirus Restriction | pune coronavirus restrictions in pune again due to fear of omicron variant PMC Commissioner Vikram Kumar

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोनाचे नियम (Pune Coronavirus Restriction) शिथिल करत शहरातील नाट्यगृह, चित्रपट गृहांची आसनक्षमता 1 डिसेंबरपासून 100 टक्के सुरु होईल अशी घोषणा केली होती.

मात्र, त्या घोषणेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच निर्बंधांनी (Pune Coronavirus Restriction) डोकं वर काढलं. ओमिक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर पुण्यातील चित्रपट आणि नाट्यगृहात सध्याच्या निर्बंधानुसार 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश मिळणार आहे. तर खुल्या जागेतील कार्यक्रमांसाठी 25 टक्के प्रेक्षकांना (audience) परवानगी असणार आहे.

या निर्बंधांचा 2 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (International Film Festival) फटका बसण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी हे नवे आदेश सोमवारी (दि.29) काढले आहेत.

पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारच्या आढावा बैठकीमध्ये मनोरंजन क्षेत्राला दिलासा दिला होता.मात्र, ही बैठक होताच काही वेळात राज्य शासनाने (Maharashtra government) नवे आदेश जाहीर केले.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे संपूर्ण जग धास्तावले आहे. याच पार्श्वभूमीवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी रात्री नव्याने आदेश जारी केले आहेत. यामध्ये चित्रपटगृह (Cinema),
नाट्यगृह (Theater), मंगल कार्यालय, सभागृह (Auditorium) यासह इतर बंदीस्त जागेतील कोणत्याही कार्यक्रमासाठी जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवाला फटका

ओमिक्रोमच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नव्याने लावण्यात आलेल्या निर्बंधांचा (Pune Coronavirus Restriction) पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवाला याचा फटका बसणार आहे. येत्या 2 डिसेंबर पासून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवाला सुरुवात होत आहे.

याशिवाय खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी 1 हजार पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असतील तर याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास द्यावी लागणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहेत. तसेच खुल्या जागेत कोणताही समारंभ, संमेलनाला तेथील जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांच्या उपस्थितीतच परवानगी देण्यात आली आहे.

महापालिकेने सोमवारी लागू केलेले आदेश महापालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला लागू राहणार आहेत.

Web Title : Pune Coronavirus Restriction | pune coronavirus restrictions in pune again due to fear of omicron variant PMC Commissioner Vikram Kumar

JanDhan Account | SBI, PNB सह ‘या’ 6 बँकांमध्ये असेल जनधन खाते तर ‘या’ पध्दतीनं तपासा बॅलन्स, जाणून घ्या पद्धत?

Pune Crime | वारज्यातील निलेश गायकवाडसह 11 जणांवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 61 वी कारवाई

Nikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड ड्रेस पाहून चाहते म्हणाले – ‘ही लवकरच उर्फी जावेद…’

The post Pune Coronavirus Restriction | ‘ओमिक्रॉन’च्या धास्तीने पुण्यात पुन्हा निर्बंध ! चित्रपटगृहात 50 % प्रेक्षकांनाच प्रवेश; जाणून घ्या सुधारीत नियम appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article