Header

Pune Crime | 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून लज्जास्पद वर्तन; चंदननगर परिसरातील घटना

Pune Crime | 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून लज्जास्पद वर्तन; चंदननगर परिसरातील घटना

Pune Crime | Shameful behavior of a 13-year-old girl sitting in a car; Incidents in Chandan nagar police station area

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | १३ वर्षाच्या मुलीला कारमध्ये बसवून तुला जेवायला घेऊन जातो़ नवीन कपडे घेतो, असे बोलून तिच्याबरोबर लज्जास्पद वर्तन (Shameful behavior) करण्याचा प्रकार समोर आला आहे. चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) एकाला अटक केली (Pune Crime ) आहे.

भीमराव शंकर पिंपळे (वय ५२, रा. लोहगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या मुलीचा तोंडओळखीचा आहे.गुरुवारी सकाळी मुलगी मुंढवा (Mundhwa) येथील शाळेत गेली असताना आरोपीने तिला शाळेच्या गेटच्या बाहेर बोलावले. तिला त्याने कारमध्ये बसायला सांगितले.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

त्यानंतर त्याने मुलीला त्याच्या मोबाईलवर फोन करायला सांगितला. शाळेत येताना सायकल आणू नको. तू वडगाव शेरी (wadgaon sheri) शेवटचा बसस्टॉप येथे ये. मी तुला माझे कारमधून शाळेत सोडतो. तसेच तुझी शाळा सुटल्यानंतर तुला जेवण करायला घेऊन जातो व तुला नवीन कपडे घेतो,

असे बोलून आरोपीने तिच्याशी लज्जास्पद वर्तन (Pune Crime) केले. ही बाब मुलीने आईला सांगितल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Shameful behavior of a 13-year-old girl sitting in a car; Incidents in Chandan nagar police station area

7th Pay Commission | मोठी बातमी ! महागाई भत्त्याच्या कॅलक्युलेशनचा बदलला फार्म्युला! जाणून घ्या आता किती मिळेल सॅलरी

Life Certificate | पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर ! ‘या’ महत्वाच्या कागदपत्राबाबत मिळाला मोठा दिलासा

Nawab Malik | ‘अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचे कटकारस्थान सुरू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार करणार’ – नवाब मलिक

Pune News | वारकर्‍यांच्या दिंडीला झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; 20 जखमी, मावळ तालुक्यातील साते फाट्यावरील घटना

LPG Cylinder Booking | गॅस सिलेंडर बुक करण्यास विसरलाततर नो-टेन्शन; कंपनी पाठवेल ‘अलर्ट’, जाणून घ्या

Narayan Rane | ‘राज्यामधील महाविकास आघाडी सरकार कोसळणार अन्….’, नारायण राणेंनी जाहीर केली तारीख

Pune NCP | ‘लसीकरणाचे योगदान देत आहेत पुनावाला आणि बॅनरबाजी करत आहेत चूनावाला’, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘थँक्यू टॅक्स पेयर’ बॅनर लावून निषेध

The post Pune Crime | 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून लज्जास्पद वर्तन; चंदननगर परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article