Pune Crime | कोंढाव्यात वीज खंडीत झाल्याने महावितरणच्या कर्मचार्यांना मारहाण

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | कोंढव्यातील वीज पुरवठा रात्रीपासून खंडीत झाल्याने संतापलेल्या दोघांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन तेथील कर्मचार्याला मारहाण केली. कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक (Pune Crime) केली आहे.
दत्तात्रय काळुराम धांडेकर , प्रथमेश सोपान धांडेकर , धांडेकरनगर, येवलेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुनिल शंकर पाटील (वय ५६, रा. आंबेगाव) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढवा (Kondhwa) येथील महावितरणच्या (Mahavitaran) सोमजी शाखा येथे बुधवारी सकाळी १० वाजता घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
धांडेकरनगर येथील वीजपुरवठा आदल्या रात्रीपासून खंडीत झाला होता. त्यामुळे चिडलेले धांडेकर हे सोमजी शाखा येथील कार्यालयात आले. त्यांनी रात्रीपासून लाईट बंद आहे, कधी सुरु होणार अशी चौकशी केली. त्या कारणावरुन शिवीगाळ करुन तेथील कर्मचारी कृष्णा गुट्टे यांना गालावर तसेच डोक्यावर हाताने चापटी मारल्या. फिर्यादी हे सोडविण्यासाठी मध्ये पडले असताना त्यांना जोराचा धक्का देऊन खाली पाडले. कार्यालयामध्ये दोघांनी मिळून आरडाओरडा करुन शिवीगाळ करुन तुम्हाला आता सर्वांना दाखवितो, असे बोलून धमकी दिली.दोघांवर गुन्हा (Pune Crime) दाखल करुन पोलिसांनी अटक केली आहे.
Web Title : Pune Crime | MSEDCL employees beaten due to power outage in Kondhwa.
Pune Crime | …म्हणून लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकले, आरोपींची कबुली
The post Pune Crime | कोंढाव्यात वीज खंडीत झाल्याने महावितरणच्या कर्मचार्यांना मारहाण appeared first on बहुजननामा.