Header

Pune School Reopen | पुण्यातील पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबरला नाही तर ‘या’ तारखेला सुरु होतील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून माहिती

Pune School Reopen | पुण्यातील पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबरला नाही तर ‘या’ तारखेला सुरु होतील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून माहिती

Pune School Repoen | pune schools will not open from 1st december due to omicron variant of coronavirus school reopen on 15 december mayor muralidhar mohol.

पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Pune School Reopen | राज्य सरकारने (Maharashtra Government) उद्या म्हणजेच 1 डिसेंबर पासून राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग सुरु (Pune School Reopen) करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबई महापालिकेने (BMC) 1 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपासून शाळा सुरु (Pune School Reopen) करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता पुणे महापालिकेनं (Pune Corporation) देखील पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी दिली.

 

शाळा सुरु (Pune School Reopen) करण्यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार  (Municipal Corporation Commissioner Vikram Kumar) यांच्या बैठक झाली. या बैठकीत पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू (Omicron Variant) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

राज्य सरकारने 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथी शाळा सुरु करण्याची घोषणा केली आहे.
मात्र, पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल.
असे महापौरांनी सांगितले. त्यामुळे शाळा सुरु (Pune School Reopen) करण्याबाबत प्रशासनात संभ्रम असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
अखेर पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात चर्चा झाल्यानंतर पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे. मात्र, ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron variant) पार्श्वभूमीवर महापालिकेने सावध पवित्रा घेतला आहे.

 

Web Title : Pune School Repoen | pune schools will not open from 1st december due to omicron variant of coronavirus school reopen on 15 december mayor muralidhar mohol.

 

 

Saral Pension Yojana | तुम्ही एकदा प्रीमियम देऊन आयुष्यभर मिळवू शकता पेन्शन, जाणून घ्या ‘या’ विशेष योजनेबाबत सर्वकाही

Aishwarya Rai | ऐश्वर्या रायला आलिया भट्टच्या भावानं केलं होतं ‘बेइज्जत’, दोघांमध्ये 36 चा आकडा; जाणून घ्या दुश्मनीचं कारण

Life Certificate | पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! आता पेन्शन मिळवण्यासाठी केवळ तुमचा चेहरा उपयोगी येईल, कागदपत्रे जमा करण्याची नाही आवश्यकता

Gold Silver Price Today | महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ तर चांदीत घट; जाणून घ्या लेटेस्ट भाव

The post Pune School Reopen | पुण्यातील पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबरला नाही तर ‘या’ तारखेला सुरु होतील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून माहिती appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article