Header

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना नवीन वर्षात मिळणार भेट ! सॅलरीत जमा होणार ‘हा’ अलाऊन्स, लवकर पूर्ण करा हे काम

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना नवीन वर्षात मिळणार भेट ! सॅलरीत जमा होणार ‘हा’ अलाऊन्स, लवकर पूर्ण करा हे काम

7th Pay Commission | 7th pay commission central employees get a gift on the new year this allowance added to the salary complete this work soon.

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  –  7th Pay Commission | नवीन वर्ष केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी तिहेरी आनंद घेऊन येत आहे. सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) वाढवण्याची घोषणा केली आहे. त्याच वेळी, जे कर्मचारी कोरोना महामारीमुळे चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स (CEA) साठी दावा करू शकले नाहीत. ते आता क्लेम करू शकतात. (7th Pay Commission)

 

कारण देशात बहुतांश शाळा सुरू झाल्या असून आता शाळांमध्ये फी जमा होऊ लागली आहे. त्याचबरोबर, सीईए क्लेमसाठी कर्मचार्‍यांना कोणतीही ऑफिशियल कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

 

किती रूपये मिळतात सीईए क्लेममध्ये –

केंद्रीय कर्मचार्‍यांना 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार मुलांच्या शिक्षणासाठी 2,250 रुपयांचा क्लेम मिळतो. जर दोन मुले असतील तर 4,500 रुपयांपर्यंतचा क्लेम मिळू शकतो. गेल्या एक वर्षात कोरोना महामारीमुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी सीईएसाठी क्लेम करू शकले नाहीत. (7th Pay Commission).

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

सीईएसाठी असा करा अर्ज –

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DOPT) एक ऑफिस ऑफ मेमोरँडम जारी केले असेन यामध्ये म्हटले आहे की, कोरोनामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांच्या शिक्षण भत्त्यावर क्लेम करण्यात अडचणी आल्या.

 

कारण ऑनलाइन फी जमा केल्यानंतरही शाळेकडून रिझल्ट पाठवले गेले नाहीत. त्याच वेळी, डीओपीटीने सांगितले की, म्हणून, सीईए क्लेम स्वयं-घोषणापत्र, रिझल्ट किंवा फी भरल्याच्या पावतीद्वारे लागू केला जाऊ शकतो. तसेच, विभागाने स्पष्ट केले की, ही सुविधा मार्च 2020 ते मार्च 2021 दरम्यान संपणार्‍या शैक्षणिक वर्षासाठी असेल.

 

किती मिळतो भत्ता?

मुलांच्या शिक्षणासाठी दरमहा 2250 रुपये सीईए मिळतो.
म्हणजे, दोन मुलांसाठी, कर्मचार्‍यांना दरमहा 4500 रुपये दराने CEA मिळतो.
मात्र, जर दुसरे मूल जुळे असेल तर पहिल्या अपत्यासह जुळ्या मुलांच्या शिक्षणासाठीही हा भत्ता दिला जातो.
त्याच वेळी, दोन शैक्षणिक कॅलेंडरनुसार, एका मुलासाठी 4500 रुपये द्यावे लागतील.
जर एखाद्या कर्मचार्‍याने मार्च 2020 आणि मार्च 2021 साठी क्लेम केला नसेल, तर त्यावर क्लेम केला जाऊ शकतो.

 

सीईए क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रे –

मुलांच्या शिक्षण भत्त्याचा दावा करण्यासाठी, शाळेचे पत्र, मुलांचा निकाल आणि फीची पावती देखील देणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर ही तिन्ही कागदपत्रे स्व-साक्षांकित करणे आवश्यक आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission central employees get a gift on the new year this allowance added to the salary complete this work soon.

 

Chandrakant Patil | ‘उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर मुख्यमंत्रिपदाचा चार्ज…’ – चंद्रकांत पाटील

Mumbai High Court | शारीरीक संबंधानंतर विवाहाला नकार देणे फसवणूक नाही; मुंबई उच्च न्यायालयाने तरूणाची केली सुटका

Maharashtra GST Department | 233 कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक; GST विभागाची पुण्यात मोठी कारवाई

WhatsApp | आता जुने चॅट आणि कॉन्टॅक्ट न गमावता कसा बदलायचा WhatsApp नंबर? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

The post 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना नवीन वर्षात मिळणार भेट ! सॅलरीत जमा होणार ‘हा’ अलाऊन्स, लवकर पूर्ण करा हे काम appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article